वडवणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी विशेष ई-पीक पाहणी अभियानाचा लाभ घ्यावा – तहसीलदार दत्ता भारस्कर

75

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

वडवणी(दि.16सप्टेंबर):- तालुक्यात दि.१३ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर २०२२ दरम्यान विशेष ई-पीक पाहणी अभियान राबविण्यात येत असून तरी वडवणी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी ई-पीक पाहणी ऍपव्दारे आपल्या शेतामध्ये उभ्या असलेल्या पिकांची नोंदणी करणे आवश्यक आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी या विशेष अभियानात सहभागी होवून याचा लाभ घ्यावा असे आवाहन वडवणीचे तहसीलदार दत्ता भारस्कर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

वडवणी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना तहसील कार्यालय वडवणी यांच्या वतीने आवाहन करण्यात येते की, दिनांक १३ सप्टेंबर ते दिनांक २१ सप्टेंबर २०२२ दरम्यान संपूर्ण वडवणी तालुक्यामध्ये विशेष ई-पीक पाहणी अभियान राबविण्यात येत आहे. या दरम्यान वडवणी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी ई-पीक पाहणी ऍपव्दारे आपल्या शेतामध्ये उभ्या असलेल्या पिकांची नोंदणी करणे आवश्यक आहे. या डिजीटल प्रणालीव्दारे नोंदणी केल्याने पीक विमा आणि पीक पाहणीचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया अधिकतेने सुलभ होईल.

तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे पीकांचे नुकसान झाल्यास अचुक भरपाई व मदत देणे ही शासनाला शक्य होईल. माझी शेती माझा सातबारा मीच नोंदविणार माझा पीक पेरा यानुसार वडवणी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी दिनांक १३ सप्टेंबर ते दिनांक २१ सप्टेंबर २०२२ दरम्यान विशेष ई-पीक पाहणी अभियानांतर्गत आपल्या शेतातील उभ्या पिकांची तात्काळ ई-पीक ऍपव्दारे नोंदणी करावी असे आवाहन वडवणीचे तहसीलदार दत्ता भारस्कर यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.