शिवसेनेत घेतला अनेकांनी पक्ष प्रवेश

  40

  ?आता शिवसेना देणार नविन चेहऱ्यांना जबाबदारी

  ✒️संतोष संगीडवार(आल्लापल्ली प्रतिनिधी)मो:-7972265275

  आलापल्ली(दि.22सप्टेंबर):-आलापल्ली विश्राम गृह येथे गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख मा. किशोर चंद्रकांत पोतदार साहेब, यांच्या प्रमुख मार्गदर्शनखाली तसेच जिल्हा प्रमुख, राजगोपाल भाऊ सुलवावार , यांच्या अध्यक्षतेखाली पक्ष प्रवेश कार्यक्रम घेण्यात आला.

  भारतीय जनता पार्टी ला राम राम करून माजी जिल्हा परिषद सदस्य, प्रमोद चौधरी व युवा तडफदार, शुभम कुंटेवार यांना शिवबंधन बांधून शिवसेनेत पक्ष प्रवेश करून घेतले, यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख रियाज भाई शेख, उपजिल्हा प्रमुख, धर्मराज रॉय, अहेरी विधानसभा क्षेत्र प्रमुख, अरुण धुरवे सर, अहेरी विधानसभा संघटक बिरजू गेडाम, उप तालुका प्रमुख, प्रफुल येरणें, शिवसेना ज्येष्ठ कार्यकर्ता, सुभाष घुट, दिलीप सुरपाम , अकुश मंडळालावार, यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश कार्यक्रम घेण्यात आले.

  यावेळी शिवसेना गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख यांनी प्रवेश केलेल्या प्रमोद चौधरी, शुभम कूंतेवार यांना शिवसेना पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी जबाबदारी दिली पक्षा सोबत प्रामाणिक पने जनहिताचे कार्य करावे आणि युवकांना शिवसेना पक्षा सोबत जोडून पक्ष संघटन मजबूत करण्याचे काम करण्याबद्दल सांगितले, सर्व शिवसैनिक पदाधिकारी नवीन पक्ष प्रवेश केलेल्या कार्यकर्ता जवळ येऊन कार्य करावे, दुजा भाव करू नये शिवसेनेत प्रवेश केलेले शिवसैनिक आपला परिवार आहे सर्वांना सामावून घ्या आणि जनतेची सेवा करावी, जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली खाली अहेरी विधानसभा क्षेत्रातील विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील कार्य करावे, पक्षाच्या हितासाठी कार्य करावे असे आवाहन शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख मा. किशोर पोतदार साहेब यांनी बैठकीत अनमोल मार्गदर्शन केले.

  यावेळी सर्व शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित राहून सदर कार्यक्रम घेण्यात आला.