तुडतुड्यामुळे भातपीक जमीनदोस्त, भातपीकाचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्या

33

🔹ब्रम्हपुरी तहसीलदार यांना निवेदन सादर

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.14ऑक्टोब:- तालुक्यातील अर्हेरनवरगाव – नान्होरी व पिंपळगाव – मालडोंगरी या दोन जिल्हापरिषद क्षेत्रातील शेतीत भातपीकाची शेती करण्यात आली असून, भातपीक गर्भासयातून निसवून लोंब भरत असताना भातपीकावर तुडतुडा या रोगाने आक्रमण केल्याने भातपीक पूर्णतः जमीनदोस्त झाले असून, शेतकऱ्यांच्या तोंडात येणारा भातपीकाचा घास तुडतुडा रोगाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या नुकसानाची शासनाकडून तातडीने सर्वेक्षण करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासनाकडे सीफारस करावी, या मागणीचे निवेदन एका शिष्टमंडळाच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजयभाऊ वड्डेटीवार, जिल्हाधिकारी चंद्रपूर, ब्रम्हपुरीचे उपविभागीय अधिकारी संदीप मस्के , तहसीलदार विजय पवार, ब्रम्हपुरी तालुका कृषी अधिकारी खंडाळे इत्यादींना देण्यात आले.शिष्टमंडळात ब्रम्हपुरी पंचायत समितीचे माजी सभापती नेताजी मेश्राम, ब्रम्हपुरी बाजारसमितीचे माजी उपसभापती काशिनाथ खरकाटे , बाजार समितीचे संचालक वामन मिसार , बेळगाव जाणीचे उपसरपंच विनोद बुल्ले , खंडाळाचे माजी उपसरपंच अरुण अलोने, तोरगाव (बु.) चे माजी उपसरपंच सुधीर शिवरकर इत्यादींचा समावेश होता.