आपल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी अतुलकुमार दादा खोब्रागडे सारखाच तरूण सिस्टम मध्ये जायला पाहिजे

30

खुप लढलो बेकीने आता लढूया एकीनेच टीमचा खंदा कार्यकर्ता असलेल्या अतुलकुमार दादा खोब्रागडेने विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या सोडवल्या आहेत.

💥 विद्यार्थ्यांचा त्याच्यावर एवढा विश्वास आहे की आपण अतुलदादाला मदतीसाठी हाक मारली तर दादा नक्कीच मदत करतो असा विद्यार्थ्यांचा आवडता आहे.

💥 नागपूरच्या काॅलेजमध्ये अॅडमिशन केलेल्या गावातल्या विद्यार्थ्यांना रहायला होस्टेल मिळत नाही तेव्हा त्यांची तात्पुरती सोय एकीकडे करून त्यांना वसतिगृहात अॅडमिशन मिळेपर्यंत अतुलकुमार त्याच्या संपर्कात रहातो.अशा अनेक गावाकडील विद्यार्थ्यांना त्याने मदत केली आहे.

💥देशातल्या नामवंत इंस्टीट्यूट मध्ये एका मुलीला अॅडमिशन मिळाली. मुलीचे आई वडिल हातमजूर. एॅडमिशनचा खर्च 60000 .रात्री ती अतुलदादाला फोन करते. अतुल तिची गोष्ट समाजातल्या दानी लोकांपर्यंत पोहचवतो. दुस-या दिवशी दानी लोकांनी तिची अॅडमिशन करून दिली.

💥 वेदांता मेडिकल कॉलेज मध्ये आपल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला तेव्हा यंत्रणेशी भांडून अतुलकुमार ने आपल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून दिला.

💥 आपल्या विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षेबद्दल माहिती व्हावी यासाठी दरवर्षी मार्गदर्शन शिबिर लावतो.

💥आपल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या अभ्यासक्रमाबद्दल माहिती व्हावी यासाठी दरवर्षी अत्तदिप भव ही मॅगझिन काढतो.

💥 दरवर्षी विद्यार्थ्यी महोत्सव घेऊन महापूरूषांचे विचार आपल्या विद्यार्थ्यांमध्ये पेरून त्यांच्या भविष्याला आकार देण्याचा प्रयत्न करतो.

💥उच्च शिक्षण संस्था मध्ये आपल्या विद्यार्थ्यांना जातीवादाचा सामना करता यावा यासाठी SC/ ST सेलचा आग्रह सरकार कडे करतो.

💥 ओबीसी विद्यार्थ्यांच्या साठी महाज्योती प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्यात यावा यासाठी सातत्याने सरकारला निवेदनं देतो आहे.

💥विद्यार्थ्यांना Deem university, autonomous colleges and self finance काॅलेजेस मध्ये स्कालरशीप नव्हती. अतूल ने सतत पाठपुरावा करून 2018 साली ही स्कालरशीप विद्यार्थ्यांना लागू केली त्यामुळे आता आपल्या विद्यार्थ्यांना क्वाॅलीटीच शिक्षण मिळणे सोपे झाले.

💥रोजंदारीवर काम करण्यास बरीच श्रमिक नागपूर ला येतात त्यांच्या मुलांसाठी street school

💥अनेक गरीब विद्यार्थ्यांची फक्त पैशाअभावी चांगल्या काॅलेज मध्ये अॅमिशन होण्यास अडचण येते तेव्हा अतुल त्या विद्यार्थ्यांसाठी समाजातून निधी गोळा करून त्याची अॅडमिशन करून देतो. त्याच्या या मदतीमुळे आज अनेक विद्यार्थ्य्यांनी चांगल्या युनिवर्सिटी मधून शिक्षण घेतले तर काही घेत आहेत.

💥 ऑनलाईन स्कालरशीप वेळेवर मिळावी यासाठी सरकारला तांत्रिक उपाय सुचवलेत.

💥गरीब विद्यार्थांसाठी एक वही एक पेन हा उपक्रम आणि धम्मचक्रप्रवर्तन दिनाच्या दिवशी व 6 डिसेंबर ला ग्रामीण विद्यर्थ्यांसाठी मार्गदर्शन केंद्र दरवर्षी चालवतो.

💥 आर्थिक आधारावर लागू करण्यात आलेल्या आरक्षणाचा विरोध करण्यासाठी मोठं आंदोलन केलं.

💥स्कालरशीप व फीस आकारणा-या संस्था चालकांच्या विरोधात आवाज उचलून *फिस कमी करायला लावली.

 

💥 ओबीसींची जनगणना करण्यात यावी याचा पाठपुरावा करतो आहे.

💥ओबीसी बांधवांना पुर्ण स्कालरशीप आणि वसतीगृहाची मागणी लावून धरली आहे.

आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर जेव्हा सगळे नेते गप्प बसतात तेंव्हा हा तरूण सरकारला धारेवर धरतो.

असा लढवैया आणि तडफदार अतुलकुमार दादा खोब्रागडे यावेळची नागपूर पदवीधर मतदार संघाची निवडणूक लढवतोय.

आपल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी अतुल कुमार दादा खोब्रागडेसारखाच तरूण सिस्टम मध्ये जायला पाहिजे.

सर्व पदवीधर बांधवांना विनंती आहे की येत्या 1डिसेंबरला होणा-या नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत अतुलकुमार दादा खोब्रागडे यांच्या समोर पसंती क्रमांक 1 लिहून त्यांना प्रचंड मताने निवडून आणा.

खुप लढलो बेकीने
आता लढूया एकीनेच