२० डिसेंबरला बल्लारपूर बामणीत ओबीसी आरक्षण बचाव परिषद

26

🔹ओबीसींच्या विविध मागण्यांवर विचारमंथन होणार

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.18डिसेंबर):-राष्ट्रीय ओबीसी महासंघ बल्लारपूरच्या वतीने जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र जनगणना झाली पाहिजे, या मागणीसाठी ओबीसी आरक्षण बचाव परिषद येत्या २० डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता बल्लारपूर तालुक्यातील बामणी येथील निवलकर लॉन येथे आयोजित करण्यात आले आहे. या परिषदेत ओबीसींच्या जातीनिहाय जणगणनेवर विचारमंथन होणार आहे.

आरक्षण बचाव परिषदेचे उद्द्याटन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्या हस्र्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी ओबीसी नेते बबनराव फंड राहणार आहे. स्वागताध्यक्ष म्हणून सुभाष ताजणे, प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे, महासचिव सचिन राजुरकर, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन कुकडे उपस्थित राहणार आहे.

या ओबीसी परिषदेदरम्यान सन २०२१ च्या राष्ट्रीय जनगणनेत ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणनेवर विचारमंथन केले जाणार आहे. मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करू नये, वर्ग ३ व ४ पदाचे ओबीसींचे कमी झालेले आरक्षण पूर्ववत करण्यात यावे, ओबीसी विद्याथ्र्यासाठी स्वतंत्र वसतीगृह सुरू करण्यात यावे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा लवकरात लवकर घेण्यात यावी, ओबीसी समाजासाठी घरकुल योजना सुरू करावी यासह विविध २१ मागण्या शासन दरबारी लावून धरण्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे.

ओबीसी परिषदेला मोठ्या संख्येन समाजबांधवांनी उपस्थित दर्शवावी असे आवाहन बल्लारपूर तालुका राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष गणपती मोरे, उपाध्यक्ष कार्तिक जीवतोडे, सचिव राजेश बट्टे, सहसचिव सुरेश पंदीलवार, कार्याध्यक्ष दिवाकर झाडे, राजेश खेडेकर, राजू निखाडे, संदीप पोडे, अविनाश जमदाडे, ऋषी पिपरे, ज्ञानेश देरकर, वैभव साळवे, सुभाष काळे, उमेश सपाटे यांनी केले आहे.