साहित्यिक विशाल पाटील , वेरुळकर यांची अमरावती विभागीय अध्यक्ष पदी नियुक्ती

38

✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620

बीड(दि.20डिसेंबर):-अखिल भारतिय मराठी साहित्य परिषदेच्या अमरावती विभागीय अध्यक्ष पदी विशाल पाटील , वेरुळकर यांची नियुक्ती करण्यात आली.विशाल पाटील वेरुळकर उत्तम कवी /लेखक व उत्कृष्ट निवेदक आहेत. त्यांच्या कविता व लेख अनेक वर्तमानपत्रात प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या साहित्यक्षेत्रातील कामगिरीची दखल घेऊन त्यांना अनेक नामवंत संस्थांनी विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

त्यांची अमरावती विभागीय अध्यक्ष पदी नियुक्ती केली असून यांनी साहित्य क्षेत्रातील, वंचित,तडागाडातील कवी,लेखक,साहित्यिक यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या आणि आपल्या कार्याच्या माध्यमातून एक विचारमंच उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन साहित्य क्षेत्रातील नव कवी,कलावंत यांना दिले आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद चे मा.श्री आनंदकुमार शेंडे. विदर्भ विभागीय अध्यक्ष यांनी विशाल पाटील , वेरुळकर यांना नियुक्त पत्र देतांना खुप खुप शुभेच्छा दिल्या. व नियुक्तीबद्दल राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे, यांनी उज्वल साहित्यिक वाटचालीस अनेक शुभेच्छा दिल्या.तसेच राजकुमार काळभोर राष्ट्रीय उपाध्यक्ष, तसेच नागपुर विभागिय अध्यक्ष सतीश सोमकुंवर, जयेंद्र चव्हाण नागपुर विभागीय सरचिटणीस आदींनी भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

तसेच वृत्तपत्र सायबर क्राईम संपादक श्री.चं.मो.दुर्बे , साहित्यिक श्री. वैभव कन्हेरकर , अंगद दराडे श्री दिलीप काळे , श्री.बच्चु भाऊ गावंडे , डॉ.दिनेश मोहरील , श्री.प्रदिप हिवरखेडे , श्री.विकास पालवे , मयुरी कहाळे , श्री.जयेंद्र चव्हाण , गोपाल मेहंगे , निखिता मधुकर डाखोरे यांच्या कडून व मित्र मंडळी आप्तजनांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता. विशाल पाटील , वेरुळकर यांच्या उज्वल साहित्यिक वाटचालीस अनेकानेक शुभेच्छा!