जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळा मुडाणा राबवितेय नाविन्यपूर्ण उपक्रम

37

✒️यवतमाळ(पुरोगामी संदेश नेटवर्क)

यवतमाळ(दि.31डिसेंबर):-कोरोना 19या महामारीच्या काळात, संपूर्ण जग 2020 पुर्ण संघर्षात गेले, या काळात, सगळेजनजीवन विस्कळीत झाले असून याचा प्रभाव शिक्षणक्षेत्रावर कमालीचा झालेला आहे, अगदी महाविद्यालय ते प्राथमिक शाळा, या काळात संपूर्ण देशात सामाजिक अंतर पाळणे आवश्यक व बंधनकारक होते, म्हणूनच तर संपूर्ण महाराष्ट्रात शाळा बंद ठेवण्यात आले होते.

सदर काळात शाळा जरी बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षक आँनलाईन पद्दतीने अभ्यास विद्यार्थ्यांना देऊ लागला, विविध सोशल मीडिया नेटवर्क चा वापर करून जसे, टेलग्राम, फेसबुकवर, वँटस ऐप गृप करून, युट्यूब चॅनलच्या माध्यमातून, ब्लाँगवरून, झूम मिटिंग, गुगल मीट, पी, डि एफ फाईल स्वरूपा, गुगल फार्म,ई एक नव्हे नानाविध नेटवर्क तयार करून फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात कायम स्वरूपी ठेवण्यासाठी शिक्षकांनी मेहनत घेतली आहे.

आमच्या शाळेत सर्व शिक्षकांनी विविध शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून ते विद्यार्थ्यांना देऊन विद्यार्थ्यांचा अभ्यास अविरत चालू ठेवण्यासाठी प्रयत्न केला, त्यात खास करून गावातील शिक्षण मित्रमंडळी च्या माध्यमातून व स्वाध्याय झेराँक्स काढुन विद्यार्थ्यांना देउन पुर्ण करून घेतले, त्या पैकी गावातील चौका चौकात, गल्ली गल्लीत, डिजीटल शैक्षणिक बँनर विविध विषयांवरील बनवून, चिटकविले, जेणेकरून विद्यार्थी डिजीटल शैक्षणिक बँनर बघून, अभ्यास करून वँटस ऐप गृपमध्ये शेअर करू लागला, याघा मुख्य फायदा म्हणजे विद्यार्थी डिजिटल बँनर वरील अभ्यास करू लागला.

शनिवार गोष्टींचा वार म्हणून, विद्यार्थी गोष्टींची पुस्तके आलडिने वाचु लागला, तंबाखू मुक्ती चे आँनलाईन कार्यशाळा, योगासन आँनलाईन पध्दतीने, आँनलाईन पध्दतीने अभ्यास, वाचन, तोंडि प्रश्नोत्तर,चला जाऊ फुलांच्या जगात, या मुळे वनस्पती ची विविध फुलांचे रंग, फुलांच्या विविध भागांची नाव, वनस्पती नाव, असे विविध शैक्षणिक उपक्रम राबविले गेले,या कालावधीत विज्ञान व गणिती क्रिया आँनलाईन पध्दतीने अभ्यास करून घेतला.

या कार्यक्रमासाठी खास विद्यार्थ्यांना पालकांनी पण मोबाईल देउन पुर्ण सहकार्य केले आहे. आणि प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात ठेवण्यासाठी आम्हाला मदत केली त्या मुळेच हे शक्य झाले