धक्कादायक… आई नंतर मुलानेही सोडला प्राण

  38

  ?कुंडलवाडी शहरातील दुःखद घटना

  ✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

  कुंडलवाडी(दि.24जानेवारी):-ज्या आईने आपल्याला या जगात आणले,जगायला शिकविले तीच आई या जगातुन निघुन गेली.त्या आईच्या निधनाची बातमी समजताच मुलाला हा आघात सहन न झाल्याने मुलाचाही -हदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची दुःखद व -हदयद्रावक घटना कुंडलवाडी शहरातील वंजार गल्ली भागात दि.२३ जानेवारी रोजी रात्री घडली आहे.कुंडलवाडी शहरातील वंजारी समाजातील ज्येष्ठ महिला बुधाबाई चिन्नोजी गंगोणे (वय १०५) यांचे दि.२३ जानेवारी रोजी सांयकाळी ५:३० वाजेच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले.

  आईच्या निधनाची बातमी कळताच मुलगा अशोक चिन्नोजी गंगोणे (वय ७५) यांना दुःख सहन न झाल्याने अवघ्या तीनच तासात रात्री ८:३० वाजेच्या सुमारास आई पाठोपाठ मुलाचाही -हदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले आहे.

  या घटनेमुळे गंगोणे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच वंजारी समाज व कुंडलवाडी शहर व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अशोक चिन्नोजी गंगोणे हे येथील कृषी उत्पन्न बाजार परिसरातील आडत दुकान येथे मुनीम म्हणून गेली अनेक वर्ष काम केले होते.आई व मुलावर नागणी रोडवरील स्मशानभूमीत दि.२४ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार दुपारी करण्यात आले या वेळी शहरातील सर्व थरातील मंडळी उपस्तिथ हाेते.