सरपंच पदासाठी शपथ विधी घेण्यासाठी थेट हेलिकॉप्टरने आगमन

33

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)मो:-9403277887

अहमदनगर(दि.16फेब्रुवारी):- जिल्ह्यातील आंबी दुमाला गावात सरपंच जालिंदर गागरे यांचा अनोखा शपथविधी ग्रहण विधी सोहळा संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला आहे. सरपंच पदासाठी शपथ विधी घेण्यासाठी थेट आगमन हेलिकॉप्टरने एन्ट्री केली व नगर जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. या सोहळ्यासाठी अख्खा गाव उपस्थित होता. सनई ढोल-ताशांचा गजर, बाल- वृद्धांचा लेझीम नाद व महिला फेटे बांधून सज्ज होत्या . सरपंचाची हेलिकॉप्टरने आगमन असं नाविन्यपूर्ण सोहळा गावकऱ्यांनी अनुभवला.

मुख्यमंत्र्यांना लाजवेल असा नाविन्यपूर्ण शपथविधी ग्रहण सोहळा पार पडला. सरपंच हेलिकॉप्टर मधून उतरताच 12 बैलगाड्यांच्या रथातून त्यांची मिरवणूक काढण्यात आली.जालिंदर गागरे हे पुण्यात उद्योजक आहे. पुणे येथे त्यांच्या विविध कंपनी आहेत, त्यातून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. पुण्यात राहत असले तरी गावाशी त्याची नाळ जोडलेली आहे व गावच्या विकासासाठी त्यांनी निवडणूक लढविली व पूर्ण पॅनल विजयी होऊन सरपंच पदाची सूत्रे त्यांच्याकडे आली. विशेष म्हणजे शपथविधीसाठी आमदार नेतेमंडळी उपस्थित होते.