रणमोचन येथे जिजाऊ ब्रिगेडची कार्यकारिणी गठीत

30

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.8मार्च):-आजच्या युगात महिला कुठल्याही क्षेत्रात मागे राहिल्या नाहीत, प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपला ठसा उमटविला आहे. त्यामुळे खेड्यातील महिलांनी स्वतःला पुरुषांच्या तुलनेत कमी न लेखता व कुणावरही अवलंबून न राहता आत्मनिर्भर व स्वावलंबी बनण्यासाठी पाऊले उचलली पाहिजेत. परिस्थितीशी संघर्ष करण्यासाठी जिद्द,चिकाटीने समोर येत परिश्रम करीत आपले ध्येय गाठण्यासाठी सदैव तत्पर असले पाहिजे, यासाठी जगातील थोर महिलांचे आत्मचरित्र्य वाचून त्यांचे विचार आत्मसात करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मराठा सेवा संघ ब्रम्हपुरीचे खेमराज तिवाडे यांनी केले. ते रणमोचन येथे आयोजित महिला मुक्त संवाद या छोटेखानी कार्यक्रमात बोलत होते.

सदर कार्यक्रमाला जिजाऊ ब्रिगेड ब्रम्हपुरीच्या सौ. कल्पना तिवाडे, सौ. गायत्री पिलारे, पत्रकार गोवर्धन दोनाडकर,पत्रकार महेश पिलारे, होमराज नाकतोडे, मिलिंद दोनाडकर आदी. मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिजाऊब्रिगेडच्या सौ. कल्पना तिवाडे यांनी महिलांच्या आरोग्य विषयकसमस्या व उपयायोजनांवर प्रकाश टाकला. प्रसंगी तालुक्यातील रणमोचhन गावात महिलांची जिजाऊब्रिगेडची कार्यकारिणी गठीत करण्यात आली. यात जिजाऊब्रिगेड शाखा रणमोचनच्या अध्यक्षपदी सौ. दर्शना रूपचंद दोनाडकर, उपाध्यक्ष पदी प्रमिला शंकर प्रधान तर सचिव पदावर सुवर्णा धनिकराम कावळे यांची निवड करण्यात आली.

तसेच सहसचिव म्हणून अर्चना ज्ञानेश्वर मैंद, कोषाध्यक्ष पदी रीना पेरू राऊत यांची तर सर्वस्वी सदस्य म्हणून शालू चंद्रलाल सहारे, प्रियंका प्रकाश कुथे, ज्योती कार्तिकशाम चव्हारे, सुवर्णा सुनिल सहारे, योगीता विनोद दोनाडकर,अश्विनी अनिल दोनाडकर, संगिता मिलींद दोनाडकर, सरीता श्रीराम कावळे, योगीता एकनाथ गुरूनुले, सुरेखा संदिप कुथे, इंदिरा ईश्वर दोनाडकर, अस्मिता संजय प्रधान , प्रतिभा प्रकाश ढोरे, संगीता राजीव प्रधान ललीता बंडू शेंडे, भाविका बाळकृष्ण दोनाडकर आदींची निवड करण्यात आली.