विज कनेक्शन तोडणी तात्काळ बंद करा अन्यथा आंदोलन – अँड आळनुरे

72

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.20मार्च):- शहर ग्रामीण भागात महाविरण कंपनीने सुरू केलेली थकीत वीज वसुली व वीज तोडणी तात्काळ बंद करावी अन्यथा रासपाचा वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रासपाचे जिल्हाध्यक्ष अँड संदीप आळनुरे यांनी दिला आहे.

तहसीलदार गंगाखेड,पोलिस स्टेशन,महावितरण गंगाखेड यांना देण्यात आलेल्या निवेदनात कोव्हीड कोरोना लाँकडाउन मुळे सर्व ठप्प झाले होते.असंख्य लघु उद्योग बंद झाल्याने मजूर वर्ग रस्तावर आला होता.तर बाजारपेठ बंद झाल्याने व्यवहार ठप्प झाले होते.शासनाने कोरोना कालावधीतील वीजबील माफ करण्यामची घोषणा केली पण प्रत्यक्षात आमलबजावणी करण्यात आलीच नाही.

गंगाखेड तालुक्यात बारा कोटीची वीजबील थकबाकी आसल्याने महावितरण कंपनीने पाच कोटीचा वसुलीचे उदिष्ठे ठेवत धडक वीज तोडणी मोहिम हाती घेतली आसून थकबाकी वसुलीसाठी महावितरण कर्मचारी वीजबील भरण्यासाठी संबधित वीज ग्राहकास जागेवरून हालु न देता वीजबील भरण्याची दमदाटी करत वीज तोडणी करण्याचे प्रकार करत आसल्याची बाब समोर आली आहे.महावितरण कंपनीने शहरासह ग्रामीण भागात सुरू केलेली सुलतानी वीजबील वसुली मोहिम तात्काळ थांबविण्यात यावी अशी मागणी रासपाचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष संदीप आळनुरे ,जिल्हा प्रभारी सुरेशदादा बंडगर,तालुका अध्यक्ष शेषेराव सलगर,ओबीसी सेल विधानसभा अध्यक्ष ब्रिजेश गोरे,एकनाथ गेजगे,महेश अप्पा शेटे,नगरसेवक सत्यपाल साळवे, आकश मोटे, फेरोज पटेल,माधव पाढरे यांनी केली आहे.