मराठ्यानो व्यापारी बनून आपापल्या क्षेत्रात सर्वोत्तम बना -राजेश मोरे

47

✒️उमरी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

उमरी(दि.5मे):- गेल्या अनेक वर्षापासून चालत आलेल्या मराठा आरक्षणाच्या लढाईत मराठा समाज अपयशी ठरला असून, आता समाजातील युवकांनी नवनवीन उद्योग चालु करुन व्यापारी व्हावे पैश्याच्या जीवावर व्यवस्था अशी काचाकच वाकवावी कि रडण्यापेक्षा अशी मोठी अर्थशक्ती तयार करा कि सिस्टम सुद्धा हलली पाहिजे.आजच्या निर्णयानंतर भावनेच्या भरात कोणी आत्महत्या सारख पाऊल उचलत असेल किंव्हा तुम्हाला संशय येत असेल की व्यक्ती काहीतरी बरे वाईट करण्याच्या मनस्थितीत असेल ती ओळखा आणि वेळीच त्यांना रोखा.

हारणाऱ्याच्या आणि रडणाऱ्याच्या कुळात जन्माला आला नाहीत. रडणं नाही तर लढणं आपल्या रक्तात आहे आपला इतिहास चाळून बघा.राजकीय पक्षांची तळी उचलायची आता तरी बंद करा. त्यांना फक्त तुमच्या मताशी देणं घेणं आहे. राजकीय बापापेक्षा स्वतःच्या बापाच्यां तुमच्या काळजी पोटी रोज रात्री भिजणाऱ्या उशांची जाणीव ठेवा.पावसात भिजलेले नेते पाहुन भावनेच्या भरात येऊन यापुढे तरी मतदान करु नका.

आरक्षण मागुन विनंती करुन भेटले नाही आता हळूहळू हिसकावून घ्यायला शिका… असे छावा युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेश पाटील मोरे यांनी म्हटल