जीवलग गरीब मित्राला वाचविण्यासाठी केली एक लाख रुपये मदत

26

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नाशिक(दि.6मे):- दिंडोरी तालुक्यातील जऊळके दिं येथील खंडु गोतरणे हे कोवीड पाॅझीटिव्ह आढळून आल्यानंतर त्यांची प्रकृती घरी खुपच खालावली.. हि गोष्ट तुकाराम जोंधळे यांना समजल्यानंतर त्यांनी त्याला ओझर येथील हाॅस्पीटल येथे अॅडमीट केले..

तब्बल 26 दिवस उपचार केल्यानंतर आज खंडु गोतरणे यांना घरी सोडण्यात आले. या दरम्यान ग्रामस्थांनी तेरा हजार व तुकाराम जोंधळे यांनी एक लाख दहा हजार रुपये मदत करुन आपली मैत्री निभावली.. त्यांच्या या मैत्रीचे कौतुक व धन्यवाद राष्ट्रीय विश्व गामी पत्रकार संघाचे संतोष निकम सर यांनी केले