साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे आधार प्रतिष्ठान, संत रोहिदास महाराज समाज प्रबोधन मंडळ, व नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस महाराष्ट्र राज्य ठाणे जिल्हा यांच्या आयोजनाचे शिवबा मोफत अन्न छात्रालय चे उदघाटन संपन्न

28

✒️अहमदपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

अहमदपूर(दि.24मे):- दि.२०/०५/२०२१ पासुन शिवबा मोफत अन्न छात्रालय सर्व सामान्य गोरगरीब जनते साठी सुरू झाले असून तर लाॅकडाऊन सुरळीत होत नाही तोपर्यंत हा उपक्रम चालु असेल. मार्च २०२० पासुन ते आजतागायत कोरोना सारख्या महामारीमुळे अनेकांचे काम धंदे सुटले आहेत व अनेक परिवारात उपासमारी ची वेळ आली असून एक वेळचे जेवणाची सुध्दा सोय होत नसल्याचे निदर्शनास येताच साहित्य सम्राट.अण्णाभाऊ साठे आधार प्रतिष्ठान,नॅशनल दलित मूव्हमेंट फाॅर जस्टीस ठाणे जिल्हा,आर्थिक स्वरूपात मदत घेऊन शिवबा मोफत अन्न छात्रालय उल्हासनगर २ येथील महात्मा गांधीनगर या परिसरात सुरू करण्यात आले होते.

आजा दि23 रोज रविवार दिवसी प्रमुख पाहुणे म्हणून एन.डी.एम.जे.ठाणे जिल्हा सचिव विनोद एस .रोकडे,एन.डी.एम.जे.ठाणे जिल्हा सहसचिव सुनिलजी ठेंगे,एन.डी.एम.जे.ठाणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख संदेशजी भालेराव,कल्याण डोंबिवली शहर जिल्हा सचिव संदीपजी घुसळे ,व पत्रकार मिलिंदजी वानखडे साहेब आदि मान्यवर उपस्थित होते.

व एन.डी.एम.जे.महाराष्ट्र राज्य महासचिव मा.अ‍ॅड.डाॅ.केवल उके यांनी समस्त दानशूर दात्यांना जे शक्य होईल ती मदत या शिवबा मोफत अन्न छात्रालयाला पुरविण्याचे आव्हान केले आस्ता ठाणे जिल्हा एन.डी.एम.जे.संघटने चे जिल्हाअध्यक्ष मा.विजयजी काबंळे,क.डो.जिल्हाअध्यक्ष प्रविणजी बोदडे,यांच्या मार्गदर्शना खाली ऑल इंडिया एस.सी.एस.टी.असोसिएशन OHE शाखा कल्याण चे अध्यक्ष मा.सुनिलजी ठेंगे यांचे सहकारी मा.विजय यादव यांनी सुध्दा 20 किलो तांदूळ देऊन सहकार्य केले

तसेच सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी
साहित्य सम्राट.अण्णाभाऊ साठे आधार प्रतिष्ठान चे अध्यक्ष मा.प्रकाश सोमनाथ जाधव, उपाध्यक्ष पप्पू जाधव, कार्याध्यक्ष दादु चव्हाण, नितीन जाधव, संदिप गवळी,आदर्श कांबळे, प्रविण लोंढे,बबलु कांबळे, राजेश जाधव, यांनी अथक परिश्रम घेतले.