व्यापारी संकुलास भारतरत्न ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे नाव देण्याची मागणी

25

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.7जून):-नगरपरिषद गंगाखेड येथे समाजवादी पार्टीचे तालुकाध्यक्ष शेख उस्मान यांनी कोद्री रोड गंगाखेड येथे उत्तर बाजूस व्यापारी संकुलास भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात यावे यासाठी दि. ७ जुन रोजी नगरपरिषद गंगाखेड येथे निवेदन देन्यात आले.

निवेदन देताना आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाचे शहराध्यक्ष शेख खालेद, एम. आय. एम. चे तालुकाध्यक्ष अझर भाई ,समाजसेवक खाजाभाई पेंटर,जफर खान, शेख शफी, मतीन कादरी, शेख शरीफ, शेख सलमान, शेख सत्तार,सर्व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते