राजश्री शाहु महाराजांचे कार्य देशाला दिशा देणारे -समतादूत प्रज्ञा राजूरवाडे

26

✒️सुयोग सुरेश डांगे(विषेश प्रतिनिधी)

चिमूर(दि.27जून):-राजश्री शाहु महाराज हे लोकशाही चे खरे आधारस्तंभ होते, आपल्या कृतीतून त्यानी अस्पृश्यतेचि बंधने तोडून बहुजनांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण व सामाजिक न्याय वेगवेगळ्या योजना महत्वाचा हे ओळखून कृती केली आणि बहुजनांना सन्मानाच्या आरक्षनाचा बहुमान मिळवून दिला. या देशाचे उद्धार कर्ते कोहिनुर हिरा ड्रा बाबासाहेब आंबेडकर आहे हे त्यांच्या संशोधक व सत्यशोधक दृष्टीने ओळखले होते म्हणून बाबासाहेबांच्या सर्व कार्यात मोलाचा पाठिंबा दिला.

स्त्रीयांचा सन्मान विज्ञान वादि दृष्टी कोण जोपासुन महात्मा फुले व शिवबा च्या विचार कृतीतून उतरून सामाजिक सुधारणा केली असे लोकांचे राजे प्रजेच्या कल्याणा साठी सतत कार्य करणारे आज उज्वल भारत देशाची प्रगती करायची असेल तर लोकराजा राजश्री शाहु महाराजासारखे उदार अंतःकरण हवे त्यांच्या कार्याचा वारसा चालवणे महत्वाचे आहे, त्यांचे च कार्य हे देशाला नवी दिशा देणारे आहे असे प्रतिपादन समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांनी राजश्री शाहु महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिवस शिवापूर बंदर येथे साजरा करताना आपल्या प्रमुख मार्गदर्शनात बोलत होत्या.

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सरपंच मंजुषा ननावरे होत्या तर प्रमुख अतिथी ग्रामपंचायत सदस्य स्वप्ना सोनवणे, अंगणवाडी सेविका रमाबाई लोणारे, देवकन्या वासनिक आदी उपस्थित होत्या. सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनेची माहिती दिली. या कार्यक्रमाचे संचालन शशीकला ननावरे यांनी केले तर आभार आशा वर्कर छाया गायकवाड यांनी मानले. यावेळी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी परिसरातील भरपूर संख्येने स्त्री व पुरुष उपस्थित होते