दिंडोरी तालुक्यातील लखमापुर फाटा येथे तिहेरी अपघातात एक ठार

26

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

दिंडोरी(दि.18जुलै):- तालुक्यातील लखमापुर फाट्याजवळील भाग्यलक्ष्मी वे ब्रिज समोर दुपारी मोटर सायकल व स्विफ्ट कार यांची समोरासमोर धडक होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाला.
परमोरी येथील शेतकरी सुनील निवृत्ती काळोगे (50) हे लखमापूर फाट्या जवळील शेतातून काम आटपून डिलक्स मोटरसायकल क्रमांक एम एच. 15 एच. 80 65 ने दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घरी परतत असताना लखमापूर फाट्याजवळ भाग्यलक्ष्मी वे ब्रिज समोरच स्विफ्ट कार क्रमांक एम. एच. झिरो चार इ. टी. 84 एकोणवीस  ही कार वनी कडून लखमापुर फाट्याकडे येत होती.

परंतु ओव्हरटेकच्या प्रयत्नात स्विफ्ट कारणे मोटर सायकल ला जोरदार धडक दिली यात मोटरसायकल चालक सुनील काळोगे हे गंभीर जखमी झाले.  त्यांना पुढील उपचारासाठी 108 रुग्णवाहिका मधून वनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केले याबाबत वाणी पोलिसांनी स्विफ्ट कार चालकावर अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलिस करीत आहे