फवारणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

29

🔹गोंडपिपरी तालुक्यातील सुपगाव येथील घटना

✒️नितीन रामटेके(गोंडपिपरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8698648634

गोंडपिपरी(दि.6ऑगस्ट):- शेतकरी जगायचं की मरायचं अशी परिस्थिती कोरोना च्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या समोर उपस्थित झाली आहे. सध्या शेतीच्या कामाला सुरुवात झाली आहे, अशातच शेतकऱ्यांना काळ सुद्धा घात करताना दिसत आहे, गोंडपिपरी तालुक्यातील सुपगाव येथील शेतकऱ्यांसोबत असाच जिवाचा घात झाला आहे. सूपगाव येथील शेतकरी श्री. लिंबचंद कंगारुजी दुर्गे वय 36 असे शेतकऱ्यांचे नाव असून तो नेहमीप्रमाणे सकाळी शेतात उठून गेला. सध्या कपाशीवर फवारणी ची आवश्यकता असल्यामुळे सकाळी उठून फवारणीचे सर्व औषधी व साहित्य पकडून शेतात गेला. शेतकऱ्यांचा आनंद हा शेतीच्या पिकात असतो. आपले पीक पाहून पिकाला फवारणीची गरज आहे म्हणून शेतात गेला. ना पोटात अन्न जीवाची काळजी करत पूर्ण कपाशीवर फवारणी केला.

आता फवारणी झाले माझे पीक भरभराट होईल या आनंदात होता. सकाळपासून आल्यामुळे आता माझी फवारणी झाली म्हणजे आता मी जेवण करू शकतो या विचाराने तो दुपारी ३.०० वाजताच्या सुमारास आपल्या शेता जवळील विहिरीवर येऊन जेवण करण्याची तयारी केला जेवणाचा डबा खोलून आता आपल्याला पाणी पिण्यासाठी पाण्याची गरज आहे म्हणून, विहिरीतून पाणी काढण्यासाठी बालटी टाकले असता या शेतकऱ्याचा अचानक तोल विहिरीत गेला.

कुणी जवळ नसल्यामुळे त्या शेतकऱ्याला वाचवु शकले नाही. या काळाच्या घाताने या निर्दोष शेतकऱ्याचा जीव गेला. घटनास्थळी येऊन गोंडपिपरी तालुक्यातील पोलीस निरीक्षक या घटनेची पाहणी करून लिमचंद दुर्गे यांच्या देहाला गोंडपिपरी येथे पोस्टमार्टम करिता पाठविण्यात आले.श्री लिंगचंद कंगारुजी दुर्गे यांना एक मुलगा व एक मुलगी असून, अचानक झालेल्या घटनेमुळे संपूर्ण कुटुंब दुःख अवस्थेत आहेत.