आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धा २०२१ चे आयोजन….

24

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.13ऑगस्ट):-सन २०२१ मध्ये “ वर्ल्ड स्किल काॕम्पिंटिशन २०२१ (चिन – शांघाई )” येथे आयोजित करण्यात येणार आहे. त्याच्या पूर्व तयारीसाठी राज्यस्तरावर स्किल काॕम्पिटीशन आयोजन करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धा २०२१ साठी देशाचे नामांकन निश्चित करण्यासाठी दि. १७ व १८ ऑगस्ट २०२१ रोजी जिल्हास्तरावर, दि. २२ ते २४ ऑगस्ट २०२१ दरम्यान विभागीय स्तरावर व दि. ०३ ते ०५ सप्टेंबर २०२१ दरम्यान राज्यस्तरावर कौशल्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दि.१५.०८.२०२१ पर्यंत नोंदणी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांसाठी खाली दिलेल्या लिंकव्दारे नोंदणी करावी.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScc9hV8zb9-eIBlPWfEYny_XK0485eibd8vzLbX24LphXPQDw/viewform
स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळांना भेट द्यावी
https://kaushalya.mahaswayam.gov.in/
https://worldskillsindia.co.in/worldskill/world/
https://worldskillsindia.co.in/kazan2019.php तरी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी जास्तीतजास्त उमेदवारांनी ह्या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन गडचिरोली शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य संतोष सांळुके यांनी कळविलेले आहे.