महाआवास अभियान मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींचा आ. इंद्रनील नाईक यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार

103

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.3सप्टेंबर):-महा आवास अभियानामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या पुसद तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीचे सरपंच सचिव व लाभार्थी यांचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन पुसद विधानसभेचे आमदार इंद्रनीलभाऊ नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यामध्ये प्रधानमंत्री आवास योजने मध्ये प्रथम क्रमांक मोहा ( ई) द्वितीय क्रमांक श्रीरामपूर तृतीय क्रमांक माणिकडोह व राज्य योजनेमध्ये प्रथम क्रमांक चोंढी द्वितीय क्रमांक माणिकडोह तृतीय क्रमांक मोखाड या ग्रामपंचायतीचे सरपंच सचिव व लाभार्थी यांचा माननीय आमदार इंद्रनीलभाऊ नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

तसेच कोरोना योद्धा म्हणून पुसद तालुक्यातील आशावर्कर यांचा साडीचोळी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन आमदार इंद्रनीलभाऊ नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष क्रांती उर्फ बाळासाहेब पाटील कामारकर हे होते.

प्रमुख अतिथी म्हणून पुसद पंचायत समितीच्या सभापती सौ. छाया अर्जन हगवणे, उपसभापती भगवानराव भाकरे ,गटविकास अधिकारी प्रवीण कुमार वानखेडे, सहाय्यक गटविकास अधिकारी शिवाजी गवई व सर्व जि.प.सदस्य व प.स.सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती
यावेळी घरकुल विभागात काम करणारे कर्मचाऱ्यांचा आमदारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .

या कार्यक्रमाला पंचायत समितीचे सर्व कर्मचारी सर्व जि .प .सदस्य सर्व सदस्य आशावर्कर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहाय्यक गटविकास अधिकारी शिवाजी गवई यांनी केले.