धानोरा तालुक्यातील दुर्गम भागात ई-पिक पाहणी ठरत आहे अडचणीची- ई पिक पाहणीची अडचण दुर करणे बाबत निवेदनाद्वारे मागणी.!

29

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.6ऑक्टोबर):-दुर्गम भागातील आदिवासी भागात मोबाईल कव्हरेज ची गंभीर समस्या आहे. जंगल व्याप्त भागामध्ये शेतकऱ्यांची शेतजमीन आहे. त्या ठिकाणी कायम स्वरुपी कव्हरेज नाही. तसेही असून सुद्धा तालुक्यांतील विविध भागांमध्ये नेहमी कव्हरेज ची समस्या असते. प्रत्येक शेतकऱ्याकडे हॅडराईड मोबाईल उपलब्ध नसल्यामुळे, सदर क्षेत्रात ई-पिक पाहणी होऊ शकणार नाही. संपुर्ण धानोरा तालुक्यातील ८० टक्के क्षेत्रात ही समस्या आहे. त्यामूळे शासनाचे सदर उपक्रम अयशस्वी होईल.

त्यामूळे आपल्या अधिनस्त असणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांचा मार्फतीने सदर ई- पिक पाहणी करिता दुर्गम भागात मदत करण्याकरिता कार्यवाही करावी. करिता मा. जिल्हाधिकारी साहेब यांना मा. तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले.

यावेळी निवेदन जिल्हा परिषद सदस्य विनोद लेनगुरे, कामनगड चे सरपंच संजय गावडे, नरेश भैसारे यांनी मा. तहसीलदार साहेब मार्फत मा. जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले.