भाजप नगरसेवक निष्काशित

32

✒️खामगाव प्रतिनिधी(मनोज नगरनाईक)

खामगाव(दि.18ऑक्टोबर):-भाजपाचे स्विक्रुत नगरसेवक असलेले शार्प शुटर म्हणुन खामगाव परिसरात परिचीत असलेले संदिप वर्मा यांना आज भाजपा शहराध्यक्ष श्री चद्रशेखर पुरोहित यांनी पक्षाचे ध्येय धोरणे न पाळल्याची कारण देत निष्काशित केले.मागिल काही दिवसापुर्वी जिल्हाधिकारी कार्यलयात त्यांनी स्वता जाऊन आपला राजिनामा सादर केला होता.नंतर पक्षाच्या वरिष्ठांच्या सांगण्यानतर त्यांनी परत घेतला.आज हे निष्काशन पत्र देऊन त्यांना त्यांना प्राथमिक सदस्यासह सर्व पदावरुन मुक्त केले.

आधिच पक्षाच्या काही मंडळींच्या त्रासाचा सामना नगरसेवक किशोर भोसले यांनाही करावा लागला होता त्यांनी लगेच माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांचे प्रमुख ऊपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला तोच कित्ता संदिप वर्मा हि गिरवणार आहेत हे सर्व श्रुत झाले आहे.नगरपालिकेत होत असलेल्या याप्रकरणाला लवकरच आळा न बसल्यास काही महिन्यात होत असलेल्या नगरपालिका निवडणुकी मध्ये सत्ताधारी पक्षाला सुरंग लागणार हेही तितकेच खरे.