पुण्यतिथी महोत्सवात राष्ट्रसंताना भावपूर्ण मौन श्रध्दाजंली

27

🔹राष्ट्रसंतानी सुसंस्काराचे धडे दिलेत ः प्रकुलगुरू डाॕ. श्रीराम कावळे

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.26ऑक्टोबर):-आज समाजात सुसंस्काराची उणीव दिसून येत आहे.समाज दिवसेंदिवस भौतिक सुखाकडे अधिक आत्कृष्ट होत असल्याने तो आत्मकेंद्रीत होण्याची भीती आहे. अश्या परिस्थितीत देश घडविणारे हात कसे निर्माण होणार . म्हणूनच आज राष्ट्रसंताच्या परिवर्तनवादी विचांरानी नवयुवक तयार झाला पाहिजे ,असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे प्रकुलगुरू डाॕ. श्रीराम कावळे यांनी येथे केले.

अ.भा. श्रीगुरूदेव सेवा मंडळ मुख्य शाखेच्या वतीने सामुदायिक प्रार्थना मंदिर परिसरात आयोजित राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांच्या ५३ व्या पुण्यतिथी महोत्सवात झालेल्या मौन श्रध्दाजंली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .याप्रसंगी झालेल्या प्रबोधनपर कार्यक्रमात डाॕ. कावळे बोलत होते. श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष डाॕ. शिवनाथजी कुंभारे , ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर , दलित मित्र नानाजी वाढई , प्राचार्य पंडीत पुडके, अरविंद वासेकर , गोकुलनगर शाखेचे सुखदेव वेठे ,मुडझा शाखेचे घनश्याम जेंगठे, लांजेडा शाखेचे शामराव नैताम ,केशवराव दशमुखे , आत्माराम आंबोरकर, पांडुरंग घोटेकर,नशाबंदी मंडळाचे संदीप कटकुरवार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

सांयकाळी ४ वाजता राष्ट्रसंत रचित सुमधूर भजनांचे गायन सुखदेवजी वेठे आणि संपूर्ण भजन संचानी प्रस्तुत केले. वातावरणात गंभीरता पसरली.त्यानंतर सांयकाळी ४.५८ वाजता राष्ट्रसंताना साश्रू नयनांनी श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली.त्यानंतर मनोगत स्वरूपात डाॕ.शिवनाथजी कुंभारे , ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर , मनोहर हेपट, विजय साळवे ,शिख धर्म प्रतिनिधी मंगलसिंह पटवा आदींनी समयोचित विचार व्यक्त केले. सामुदायिक प्रार्थनेवर चेतन ठाकरे यांनी विचार प्रकटन केले. केशव दशमुखे गुरूजी यांनी काढलेल्या गडचिरोली पत्रिकेच्या दलित मित्र नानाजी वाढई विशेषांकाचे प्रकाशन याप्रसंगी करण्यात आले. रात्रीच्या सत्रात रामनगर श्रीगुरूदेव सेवा मंडळानी भजन प्रस्तुत केले.

थोर समाजसेवी डाॕ. शिवनाथजी कुंभारे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षांच्या निमित्ताने लावण्यात आलेल्या नशाबंदी मंडळाच्या चित्र प्रदर्शनीचे अवलोकन प्रकुलगुरू डाॕ. कावळे यांनी केले आणि मंडळाच्या जनजागृतीपर कार्याचे कौतुक केले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुरूषोत्तम कुळमेथे,मारोती उईके,मोतीराम वाढई, कवडू येरमे,मधुकर भोयर, पंकज भोगेवार ,तुषार निकुरे,चेतन नंदनवार ,नितेश गेडाम आदींचे सहकार्य लाभले.