एल आय सी कडून स्वरूप उन्हाळकरचा दहा लाख देऊन गौरव

26

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.3नोव्हेंबर):- भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एल आय सी) क्रीडा विकासाला बळ देण्याच्या उद्दिष्टाने कोल्हापुरातील प्यारा नेमबाज स्वरूप महावीर उन्हाळकर याला दहा लाख रुपये देत त्याचा मंगळवारी गौरव करण्यात आला. मुंबईतील एलआयसीच्या केंद्रीय कार्यालयाने विशेष निधीतून सरूप ला बक्षीस देण्यात आले. अशा पद्धतीने बक्षीस मिळालेला उन्हाळकर हा खेळाडू महाराष्ट्रातील पहिलाच आहे असे म्हणायला काही हरकत नाही. या मदतीमुळे त्याला मोठे प्रोत्साहन मिळाले.

पॅरालिम्पिक दहा मीटर एअर रायफल टोकियो (जपान) येथे झालेल्या स्पर्धेत स्वरूप उन्हाळकर यांनी चौथा क्रमांक पटकावला. त्याच्या या कामगिरीची दखल घेत एलआयसीने त्याची दहा लाखाच्या बक्षिसासाठी निवड केली. कोल्हापूर विभागीय कार्यालयात वरिष्ठ मंडल प्रबंधक अभय कुलकर्णी यांच्या हस्ते त्याला बक्षिसाच्या रकमेचा दहा लाखाचा धनादेश देण्यात आला. यावेळी एलआयसीचे सेल्स मॅनेजर प्रमोद गुळवणी, मार्केटिंग मॅनेजर प्रताप नलावडे प्रमुख उपस्थित होते. विमा पॉलिसी काढण्याच्या सेवे पेक्षाही एलआयसी कडून सामाजिक उपक्रम नेहमीच राबवले जातात. केंद्रीय कार्यालयाच्या विशेष निधीतून स्वरूप ला दहा लाखाचे बक्षीस देण्यात आले.

ऑलम्पिक मध्ये स्वरूप ने सुवर्णपदक मिळवावे, असे शब्द कुलकर्णी यांनी उद्गारले. कोरोना काळात सुमारे दहा लाख एजंटांच्या माध्यमातून सर्वोत्तम सेवा आणि जास्तीत जास्त दावे दिले असल्याचे गुळवणी यांनी सांगितले. कोल्हापूरच्या क्रीडा परंपरेमध्ये स्वरूप ने भर घातली असल्याचे नलवडे यांनी सांगितले. यावेळी एलआयसीचे सहाय्यक प्रशासन अधिकारी उमेश दिवेकर, पर्सनल मॅनेजर विकास तरे, प्रशिक्षक रमेश कुसाळे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते विजय जाधव, शिवानंद पाटणे आदी मान्यवर उपस्थित होते.