“शासनकर्ती जमात व्हा” या संदेशाचे पालन करत उच्च शिक्षण घ्या,उच्च पदावर जा : तहसीलदार जीवन बनसोडे

28

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.3नोव्हेंबर):-” निबिड जंगले तुडवित आलो ! रथ समतेचा इथवरं आणला सांभाळून न्यावा ” या उक्तीप्रमाणे बाबासाहेबांनी जो समतेचा रथ हाकत आणला तो आपल्या सर्वांकडे सोपवला आहे, तो आपल्याला जमेल तसा पुढे नेणे आपल्या सर्व धम्म बांधवांचे काम आहे, म.फुलेंनी सांगितलेले शिक्षण विषयक विचार, बाबासाहेबांनी सोसलेला त्रास, सावित्रीबाई यांनी शिक्षणासाठी शेणाचे गोळे खाले, बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी व संसारासाठी रमाबाईनी गोवर्या विकूण बाबासाहेबाच्या शिक्षणाला मदत केली तसा त्याग बौद्ध बांधवांनी जागृत राहून आपल्या पाल्यासाठी करुण प्रगती करावी व .शासनकर्ती जमात होण्यासाठी शिक्षण घ्या ,उच्च पदावर जा,स्पर्धा परिक्षेची तयारी कशी करावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन जतचे तहसीलदार जिवन बनसोडे यांनी सांगीतले.

कुकूडवाड येथील डॉ शुभांगी वाघमारे या भिमकन्येने एमपीएससी मध्ये मिळवलेले यश व आपल्यातील विद्यार्थी ज्यांनी विविध परिक्षा, विविध कोर्सेस मध्ये मिळवलेले दैदिप्यमान यशा बद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आज माण तालकाा स्ततरीय बौद्ध समाजा तर्फे यशस्वी विद्यार्थी यांच्या सत्काराचे हे पहिले पाऊल अतिशय नेटक्यया नियोजनाने कार्यक्रमात रंगत म्हसवडकर ग्रुपने आणली कमी वेळात झोकून देऊन सर्व कामे अतिशय सुंदररितीने पार पाडली.त्याबद्दल सर्वांंचे मान्यवरांच्या वतीने सत्कार करण्यात आला !कार्यक्रमाची सुरुवात हिंगणीच्या सिद्धार्थ गायन पार्टीच्या सुश्राव्य गायनानी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. तदनंतर प्रमुख अतिथींचे आगमन झाले.सत्कारमूर्ती पशूधन विकास अधिकारी डॉक्टर शुभांगी वाघमारे, जतचे तहसीलदार आदरणीय जीवन बनसोडे साहेब, सातारचे प्रविण शिंदे दहिवडी नगरसेविका सौ.अर्चना खरात ,अध्यक्ष बौद्ध महासभा सिद्धार्थ बनसोडे ,अँडव्होकेट बाळासाहेब सावंत , भन्तेजी आदरणीय कुमार सरतापे व उपस्थित माण तालुका धम्म बांधव,सर्व शिक्षक,शिक्षिका लहानथोर मंडळींच्या उपस्थितीत तथागत व बाबासाहेबा़ंच्या प्रतिमापुजन (मान्यवरांचे हस्ते)झाले.

त्यानंतर त्रिसरण,पंचशील ,बुद्ध पूजा,भिमस्मरण,भिमस्तुती झाली. बुद्धपूजे नंतर,व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत झाले. आदरणीय राजाभाऊ तोरणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, त्यानंतर सुशिला.बनसोडे देवापूर,कामिनी बनसोडे, डॉ किर्ती सरतापे, आदर्श शिक्षक तथा घरोघरी शाळेचे उद्गाते आदरणीय संजय खरात ,एम.डी.चंदनशिवे ,सिद्धार्थ बनसोडे ,यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते व सर्व उपस्थित शिक्षक बांधवांच्या हस्ते भिमकन्या डॉ. शुभांगी ताई वाघमारे यांचा सन्मान माण तालुका बौद्ध समाज तर्फे सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला.त्यानंतर डॉक्टर. शुभांगी वाघमारे म्हणाली शिक्षण घेत असताना निश्चित ध्येय ठरवा,ध्येय साध्य करताना कितीही अडचणी आल्या तरी डगमगू नका,खूप कष्ट करण्याची तयारी ठेवा. मला घडवण्यासाठी माझे आई वडील, चूलते व शिक्षक यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले.आहे,आय,आय,टी,अँग्री,एम.बी.बी.एस,बी.ए.एम.एस, सिव्हील इंजिनियर, नवोदय,क्रीडा स्पर्धा, यात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

त्यानंतर जिल्हा पुरस्कार प्राप्त संजय खरात ,तालुका पुरस्कार प्राप्त सुशीला बनसोडे , दयाराणी खरात , तोरणे मँडम, महेंद्र शिलवंत ,प्रविण शिलवंत भिमराव लोंढे ,विनोद शिलवंत ,हिरकणी साप्ताहिक कार्यकारी संपादक सौ.विद्या निकाळजे याचा मान्यवरांचे हस्ते शिल्ड ,प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.त्यानंतर सरणतने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.यावेळी विजय बनसोडे, राजकुमार तोरणे, विजय शिंदे , कैलाश तोरणे काशिनाथ तोरणे, एल के सरतापे ,निलेश सरतापे,सचिन सरतापे,अरुण बनसोडे,बौद्धाचार्य आबासाहेब बनसोडे,पिंटू बनसोडे सह माण तालुक्यातील शिक्षक शिक्षीका, विद्यार्थी उपस्थित होते या कार्यकरमाचे सुत्रसंचलन कैलास तोरणे यांनी केले आभार विजय बनसोडे यांनी मानले .