ग्रामिण रुग्णालय ब्रम्हपुरी येथील भव्य आरोग्य व दंत चिकित्सा शिबीरात ७७६ रुग्णांची तपासणी

33

🔸मा.ना. विजयभाऊ वड्डेटीवार, मंत्री म.रा. इतर मागास बहुजन विभाग पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांच्या हस्ते दिप प्रज्वलन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.14 नोव्हेंबर):-ग्रामिण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे दिनांक १२ नोव्हेंबर २०२१ आरोग्य व दंत चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात उद्धगाटक मा.ना. विजयभाऊ वड्डेटीवार, मंत्री म.रा. इतर मागास बहुजन विभाग, आपत्ती व्यवस्थापन मदत पुनर्वसन खार जमीन विकास तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून शिबीराची फित कापुन उद्घाटन करण्यात आले.

या यावेळी ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमीटीचे कार्याध्यक्ष तथा मुख्य प्रशासक प्रभाकर सेलोकर,तालुका काँग्रेस अध्यक्ष खेमराज तिडके ,प. स. सभापती. रामलाल दोनाडकर,अशोक रामटेके उपाध्यक्ष नगर परिषद ,डॉ. अर्पिता वावरकर जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपुर मा. संदिप भस्के उपविभागीय अधिकारी, मा. मिलिंद शिंदे उपविभागीय पोलिस अधिकारी, मा. उषा चौधरी तहसीलदार, तसेच मा. नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या. ना. विजयभाऊ वड्डेटीवार मंत्री म.रा. यांनी बहुमुल्य मार्गदर्शन केले त्यात ते म्हणाले निजी व्यक्ती निरोगी असेल त्याला सूखीजिवनाचा खरा आनंद घेता येतो. तसेच कोरोना अजूनही गेलेला नसून प्रत्येकांनी स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी घ्यावी. तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाचे होणारे दुष्परिणाम प्रामुख्याने विदर्भात आढळून येणाऱ्या पानटपरीच्या त्यांनी प्रकर्षाने उल्लेख केला.

विदर्भात वाढत्या मुखकर्करोगाबद्दल पान टपऱ्या कश्या बंद करता येईल याचे नियोजन सुद्धा करण्याचे, तसेच अत्याधुनीक अद्ययावत
रुग्णवाहीका सुद्धा लवकरच आपल्या रुग्णालयाला उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले. रा.सं. तुकडोजी महाराज यांच्या ओव्यांचे उदाहरण देवून त्यांनी अंधश्रद्धेला बळी न पडता देव देवळात नसून तो मानवी सेवेत आहे. घरीच आई-वडीलांची सेवा करा, त्यातच तुम्हाला विठूमाऊली दिसतील अशी वेगवेगळी उदाहरण देवून त्यांनी समाज प्रबोधनही केले. सदर आरोग्य शिबीरात एकुण ७७६ रुग्णांची तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आले. त्यात ३० तज्ञ डॉक्टरांच्या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये प्रामुख्याने बालरोग तज्ञ, स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ, भिषक, शल्यचिकित्सक, कान-नाक-घसा, नेत्रशल्य चिकित्सा , अस्थिशल्य चिकित्सा, आणि दंतशल्य चिकित्सा इत्यादीचा समावेश होता. सदर आरोग्य शिबीरात एकूण ९६ दंतशस्त्रक्रिया करण्यात आल्या. तसेच ४ रुग्णांवर मोठया दंतशस्त्रक्रिया करण्यात आल्या.

त्याचप्रमाणे हर्नीया हायड्रोसिल गरीरावरील चरबीच्या गाठी, स्त्रियांच्या स्तनाच्या गाठी इत्यादी वेगवेगळया आजारांची शस्त्रक्रियेकरीता २५ रुग्णांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली आहे. या सर्व शस्त्रक्रिया ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे त्या दिवसात करण्यात येणार आहेत. ज्या मोठ्या शस्त्रक्रिया ग्रामिण रुग्णालय स्तरावर करणे शक्य नाही अशा रुग्णांना वैद्यकिय महाविद्यालय, चंद्रपुर येथे संदर्भात करण्यात आले.या कार्यक्रमाचे संचालन विलास लेनगूरे तर आभार प्रदर्शन डॉ. किशोर जिवणे यांनी केले. हया आरोग्य शिबीराच्या यशस्वीते करीता ग्रा.रु. ब्रम्हपुरीचे वैद्यकिय अधिक्षक मा.डॉ. सुभाषखिल्लारे तसेच सर्व वैद्यकिय अधिकारी आरोग्य कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.