परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रभाग क्रमांक 16 येथे अन्नदान वाटप

  43

  ✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

  नाशिक(दि.6डिसेंबर):- आज दिनांक 6/12/2021 सोमवार रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तसेच भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक 16 व पंचवटी येथे गोरगरीब नागरिकांना अन्नदान वाटप करण्यात आले.

  तत्पूर्वी प्रभाग क्रमांक 16 येथील समता नगर, पंचशील नगर, आगर टाकळी, आंबेडकर वाडी, आंबेडकर नगर, येथील परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना रिपाई (आठवले) पक्षाचे राष्ट्रीय नेते तथा उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे,प्रभाग 16 चे नगरसेवक मा. सभापती मा.अनिलभाऊ ताजनपुरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

  याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जुने नाशिक मंडल अध्यक्ष मा.भास्करराव घोडेकर,जेष्ठ नेते मा.बाबुराव लोखंडे, मा.श्याम मोरे, बौध्दाचार्य राजहंस मोरे,सामाजिक कार्यकर्ते मा.शरदअण्णा जगताप,मा.दिपकभाऊ पाटील,नितीन मोरे, प्रविण आंधळे,कनकुटे फाउंडेशन चे संस्थापक मा.बाळासाहेब कनकुटे,युवा नेते सचिनभाऊ गायकवाड, दिपकभाऊ हिरे सामाजिक कार्यकर्ते मा. प्रमोदभाऊ पगारे,जेष्ठ नेते किशोर पप्पू साळवे,मा.लक्ष्मणभाऊ पगारे,यश घोडके, गणेश दिवे, महेश बुचडे, योगेश निकम,युवा नेते मा.विक्रांतजी गांगुर्डे, प्रशांत गांगुर्डे,आशिष जगताप आदी प्रभागातील महिला व नागरिक उपस्थित होते..

  अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे नाशिक जिल्हाध्यक्ष मा.सुनिलभाऊ यशवंते,रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष मा.दिपकभाऊ सावंत,नाशिकरोड शहराध्यक्ष मा.समाधान औसरमल यांनी केले होते.