मोर्शी तालुक्यातील २१ तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय बांधकामासाठी निधी मंजूर !

33

🔸आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नांमुळे ४ कोटी ६० लक्ष रुपयांच्या कामाला मिळाली प्रशासकीय मान्यता !

✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मोर्शी(दि.24डिसेंबर):-तालुक्यातील गावांमध्ये तलाठी कार्यालयाला कामकाजासाठी पुरेशी जागा नसल्याने त्याचा परिणाम शासकीय कामकाजावर होत होता. त्यामुळे तलाठी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांना तसेच ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. तलाठी कार्यालय व निवासस्थान बांधकाम हे एकाच ठिकाणी व्हावेत यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांचे प्रयत्न सुरू होते.मोर्शी तालुक्यामध्ये तलाठी कार्यालय व मंडळ अधिकारी कार्यालय व निवासस्थान बांधकामाचे कामांकरिता प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे १६ नोव्हेंबर रोजी करण्यात आली होती आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणीची दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अप्पर मुख्य सचिव महसूल विभाग यांना सादर कामाचे अंदाजपत्रक मान्यतेसाठी पाठविण्याचे निर्देश दिले होते.

आमदार देवेंद्र भुयार यांच्या विशेष प्रयत्नामुळे १५ डिसेंबर रोजी मुख्य लेखाशीर्ष ४०५९, ०७९९ अंतर्गत मोर्शी तालुक्यातील तलाठी कार्यालय निवासस्थाने बांधकामाच्या कामाकरीता ४ कोटी ६० लक्ष रुपये पुरवणी अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आले असून प्रशासकीय मान्यता देण्यात आली.आ. देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नांना यश आले असून मोर्शी तालुक्यातील हिवरखेड येथे मंडळ कार्यालय, हिवरखेड भाग १, हिवरखेड भाग २, मायवाडी, भाईपुर, पाळा तलाठी कार्यालय, मोर्शी मंडळ कार्यालय, येरला, तळणी, चिखलसावंगी, खानापूर, पार्डी तलाठी कार्यालय, अंबाडा मंडळ कार्यालय, अष्टगाव, उतखेड, दहसुर, निंभी तलाठी कार्यालय, रिद्धपुर मंडळ कार्यालय, खेड भाग १, खेड भाग २, कोळविहिर, या २१ तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय, निवस्थान बांधकामासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ४ कोटी ६० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून दिल्यामुळे आमदार देवेंद्र भुयार यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे आभार मानले.

शेतकऱ्यांच्या सातबारा पासून ते जमिनीच्या 8 अ , रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, शेतीचा फेरफार अशा इतर अनेक कागदपत्रासाठी तलाठी कार्यालयात सामान्य माणसाला जावे लागते शेतकऱ्यांना नागरिकांना या कार्यालयातून उत्तम प्रकारची सेवा मिळावी यासाठी गावातील तलाठी कार्यालय सुसज्ज व आधुनिक असावे असा आमदार देवेंद्र भुयार यांचा मानस आहे.मोर्शी तालुक्यातील गावांमध्ये कामकाजासाठी सुसज्य तलाठी कार्यालय नसल्याने त्याचा परिणाम शासकीय कामकाजावर होत होता. त्यामुळे तलाठी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांना तसेच ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. तलाठी कार्यालय व निवासस्थान बांधकाम व्हावेत यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नांना यश आले असून या २१ इमारती आधुनिक व सुसज्ज तसेच पर्यावरण पूरक असणार असून या इमारतीच्या व निवास स्थानाच्या बांधकामास त्वरित सुरुवात होणार असून यामुळे ग्रामीण प्रशासनाला गती येणार आहे. आमदार देवेंद्र भुयार यांच्यातर्फे मोर्शी तालुक्यात या सुसज्ज इमारती उभारण्यात याव्यात यासाठी शासनस्तरावर प्रथमच प्रयत्न करण्यात आला. आमदार देवेंद्र भुयार यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केल्यामुळेच शासनाने 21 नवीन इमारतीच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता प्रदान केली असल्याची माहिती यावेळी दिली .