दिग्रस येथील मालन परिसर सिध्दार्थनगर आनंद बुध्दविहारात बुध्दमुर्तीची प्रतिष्ठापना

31

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.26डिसेंबर):-दिग्रस येथील मालन परिसर सिद्धार्थनगर आनंद बुद्धविहारात सुजाता महिला मंडळ व सिद्धार्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने मालन परिसर आनंद बुद्धविहारात दि.२६ डिसेंबर २०२१ रोजी बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

आनंद बुध्दविहारास जागादान चरण वासुदेव भगत यांनी दान दिली व या बुद्धविहारास मूर्तीदान दत्ता जनार्दन केवटे यांनी दान केले त्या मूर्तीची प्रतिष्ठापना माहास्तवीर भदंत ज्ञानज्योती थेरू रामदिगी विहार ताडोबा व संच यांच्या हस्ते करण्यात आली.या कार्यक्रमास भारतीय बौध्द महासभेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

बुद्ध मूर्तीच्या प्रतिष्ठापनेनंतर भव्य भोजनाचा कार्यक्रम पार पडला व सायंकाळी ७ वाजता पंचशील भजनी मंडळ शिरोली यांनी बुद्ध भीम गीतपर संगीतमय कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सिध्दार्थ बहुउदेशिय संस्था अध्यक्ष जितेश बुरकुंडे,सुजाता महिला मंडळ अध्यक्षा सारिका गावंडे , संतोष पाझारे,राजु कांबळे,विकास गावंडे, विजय हलवले,अविनाश हलवले, राहुल सोनटक्के ,अविनाश मुळे, सनथ तुपसुंदरे,आनंद मुळे,कुणाल उमरे,अक्षय दखने, सागर दखने,गोपाल वानखेडे, अंबादास हलवले,मुंकिदा हस्ते,दिनेश हलवले, तसेच पदाधिकारी, सदस्य मंडळी आणि उपासक-उपासिका यांनी अथक परिश्रम घेतले.