हंबर्डे महाविद्यालयात दर्पण दिनानिमित्त पाच शिक्षक पत्रकारांचा सन्मान होणार

30

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.4जानेवारी):-तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अँड.बी.डी.हंबर्डे महाविद्यालयात संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे,सचिव अतुल शेठ मेहेर,सर्व संचालक मंडळ,प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.६ जानेवारी २०२२ रोजी मान्यवरांच्या शुभहस्ते महाविद्यालय आणि भाऊ फाउंडेशनच्या वतीने,दर्पण दिनाच्या निमित्ताने पाच शिक्षक पत्रकारांचा सन्मान करण्यात येणार आहे.

दै.रयतेचा कैवारी चे बीड जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र लाड,दै.दिव्य लोकप्रभा चे आष्टी तालुका प्रतिनिधी संतोष दाणी,दै.चंपावतीपत्र चे आष्टी तालुका प्रतिनिधी शरद तळेकर,दै.युवा सोबती चे आष्टी तालुका प्रतिनिधी जावेद पठाण,दै.पार्श्वभूमी चे आष्टी तालुका प्रतिनिधी बा.म.पवार हे शिक्षक पत्रकार सन्मानाचे मानकरी आहेत.हंबर्डे महाविद्यालय आणि भाऊ फाउंडेशनच्या वतीने साहित्य,सांस्कृतिक,क्रीडा याविषयी अनेक उपक्रम राबवले जातात.त्यातलाच हा एक नवीन उपक्रम यावर्षी राबवला जातो आहे.असे भाऊ फाऊंडेशनचे कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांनी सांगितले.