भगवती देवी विद्यालयात राष्ट्रमाता मा जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती

105

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.12जानेवारी):-आज बुधवार सकाळी ठीक 11:30 वाजता भगवती देवी विद्यालय, देवसरी ता. उमरखेड च्या निसर्गरम्य भव्य प्रांगणात राष्ट्रमाता मा जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या संयुक्त जयंतीला कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

प्रथमता राष्ट्रमाता राजमाता जिजाऊसाहेब व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या उपस्थित सर्वांनीच प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रल्हादराव मिरासे तर प्रमुख उपस्थिती विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक प्रकाशराव कदम, दिगंबर माने, गणेशराव शिंदे, राजेश सुरोशे, अनिल अल्लडवार, मारुती महाराज, अरविंद चेपुरवार यांची उपस्थिती होती.
तरी या कार्यक्रमात विशेष मारुती महाराज यांनी जिजाऊ वंदना गायली.उपस्थितांनी आनंद व्यक्त केला व कार्यक्रमाचा समारोप झाला.