पार्वती चॅरिटेबल हाँस्पीटलच्या प्रथम वर्धापनदिन निमित्त ह्रदय रोग व मधूमेह रुग्णांची तपासणी

54

🔸उमरखेड तालुक्यातील ७८ वाहनचालकांची अँटोरिफ्रॅक्टर मशीन व्दारे नेत्ररोग तपासणी

✒️अमोल उत्तम जोगदंडे(तालुका प्रतिनिधी)

उमरखेड(दि.24जानेवारी):: – वाहन चालवतांना वाहन चालकांसाठी त्याचे डोळे हे महत्वाचे काम करणारा शरीराचा भाग आहे, त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे हे वाहन चालकाच्या दृष्टीने फार महत्वाचे आहे. आणि हि बाब हेरत उमरखेडच्या पार्वती चॅरिटेबल हाँस्पीटलच्या प्रथम वर्धापनदिन निमित्त उमरखेड तालुक्यातील ७८ वाहनचालकांची अँटोरिफ्रॅक्टर मशीन व्दारे मोफत नेत्ररोग तपासणी करण्यात आली.सोबतच ह्रदय रोग व मधूमेह तपासणी शिबीराचे ही आयोजन २३ जानेवारीला करण्यात आले होते.

पार्वती चॅरिटेबल हाँस्पीटलच्या प्रथम वर्धापन दिना निम्मीत्य घेण्यात आलेल्या शिबिरात नेत्ररोग तज्ञ डॉ सुशील राठोड यशोदा नेत्रालय यांनी ४८, माजी नेत्ररोग चिकित्सक गणपती नेत्रालय जालना राजकुमार माळवे माळवे नेत्रालय, उमरखेड यांनी ३० अश्या एकूण ७८ वाहनचालकांची अँटोरिफ्रॅक्टर मशीन व्दारे नेत्ररोग तपासणी करण्यात आली.तसेच, ह्रदय रोग व मधूमेह तज्ञ डॉ विवेक पत्रे श्री श्री हाॅस्पीटल, उमरखेड यांनी ३० रूग्णांची तपासणी केली. पार्वती चॅरिटेबल हाँस्पीटल चे संचालक डॉ विष्णूकांत शिवणकर यांनी २० रूग्णांची तपासणी केली. ह्रदय रोग रूग्णांची ब्लड शुगर निशुल्क तपासणी करण्यात आली. ह्रदय रोग रूग्णांना आवश्यक असलेली लिपीड प्रोफाईल ही रक्ताची तपासणी श्रीराम कृपा क्लिनिकल पॅथॉलॉजी यांच्या मार्फत रू ३५० ऐवजी केवळ रू १५० मध्ये करण्यात आली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष बिचेवार, प्रास्ताविक बालाजी शिरडकर तर आभार प्रदर्शन हरिदास इंगोलकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऋषीकेश शिरडकर, परमेश्वर शेवाळकर, ओंकार कदम, दिलीप पवार, रमेश वाघमारे, निखील वरूडे,ओंकार शिरडकर, कृष्णा सावंत, आश्विनी चंदनकर यांनी परिश्रम घेतले.