राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना कोरोनाची लागण..!

26

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.25जानेवारी):-राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करुन याबाबत माहिती दिली.दरम्यान शरद पवार यांनी कोरोना लॉकडाऊनमध्ये नियमावलींचे पालन करुन घरातच राहणे पसंत केले होते. त्यानंतर, राज्यात मिशन बिगेन अगेन सुरू झाल्यानंतर त्यांनी हळूहळू राज्यात सक्रीयपणे सहभाग घेत आपले दौरे केले. सुदैवाने कोरोनापासून ते दूर होते, पण तिसऱ्या लाटेत आता त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत अनेक नेत्यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. पण बेडची गरज किंवा रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली नाही. त्यामुळे, विलिगीकरणात राहूनचा कोरोनावर अनेक नेत्यांनी मात केली आहे.राज्यात ओमायक्रॉनचा धोका वाढू लागल्याने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत खरबदारी म्हणून शासनाने राज्यात नियमावली व निर्बंध यामध्ये वाढ केली आहे.