बिहाडी येथे संत भाकरे महाराज जन्मोत्सव सप्ताह संपन्न

28

✒️कारंजा(पुरोगामी न्युज नेटवर्क)

कारंजा (दि.16 फेब्रुवारी):- तालुक्यातील बिहाडी येथे मोठया उत्साहात भागवत सप्ताह पार पडला .दैनंदिन कार्यक्रम मध्ये हरिपाठ, काकडा , ग्रामसफाई व भागवत प्रवचक नामदेव महाराज बिटने ( आळंदी ) व संच व रात्री दैनंदिन कार्यक्रम मध्ये गुरुदेव सेवा मंडळ मदनी, ह.भ.प बाल कीर्तनकार नंदिनी पाटमासे यांनी स्त्री शक्ती ला बळकट करण्यासाठी प्रेरणादायी विचार मांडले, ह.भ.प. बादलजी खंडरे महाराज यांचे सुध्दा कीर्तन पार पडले.

आळंदीकर संचाचा भारुड,भजन कार्यक्रम पार पडून काल्याचे समारोपीय किर्तन ह.भ.प.श्री नामदेव महाराज बिटने आळंदीकर यांचे काल्याचे कीर्तन पार पडले (साथकरी . हार्मोनिअम वादक.राकेश बोडखे ,पखवाज वादक सचिन महाराज ,गायक ज्ञानेश्वर महाराज राणे व कारंजा तालुक्यातील प्रतिष्ठ गायक नत्थुजी खवशी (जुनापाणी)यांनी गायनातून श्रोते जणांना मोहित केले व पालखी सोहळा होऊन महाप्रसाद संपन्न झाला..सप्ताह मध्ये भाकरे महाराज संस्थान बिहाडी व गावकरी मंडळी युवक वर्ग यांनी परिश्रम घेतले .