भीम आर्मी या सामाजिक संघटनेची जिल्हा,तालुका कार्यकारिणी जाहीर.!

31

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.17फेब्रुवारी):-भीम आर्मी भारत एकता मिशन संस्थापक प्रमुख भाई चंद्रशेखर आजाद व भीम आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनय रतन सिंह यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन व राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सिताराम गंगावने,मुख्य संघटक दिपक भालेराव यांच्या आदेशानुसार व अशोक भालेराव जिल्हाध्यक्ष भीम आर्मी यवतमाळ जिल्हा यांच्या नेतृत्वाखाली आज असंख्य कार्यकर्त्यांनी भीम आर्मी मध्ये प्रवेश केला व यवतमाळ जिल्हा व पुसद तालुका कार्यकारिणी घोषीत करण्यात आली.

यावेळी जिल्हा महासचिव धनराज कांबळे,श्याम देवकुळे जिल्हा उपाध्यक्ष,जिल्हा सचिव अली खान,पुसद तालुका उपाध्यक्ष अजय लोखंडे, महासचिव शेख खान,तालुका संघटक तुर्शल बरमाते,पुसद शहर अध्यक्ष आकाश नेटके इत्यादी कार्येकर्त्याची पद नियुक्ती करण्यात आली.