645 वी संत रविदास महाराज यांची जयंती साजरी

27

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9822995466

उमरखेड(दि.17फेब्रुवारी):- माघ पोर्णिमा संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांचा जन्म झाला. त्यांनी समता, बंधूता ची शिकवण दिली.तरोडा येथे संत शिरोमणी गुरू रविदास महाराज 645 वी जयंती रविदास समाजग्रह येथे रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण, श्रीफळ फोडून साजरी करण्यात आली.
सर्वांनी रविदास महाराज यांना विनम्र अभिवादन केले.

यावेळी प्रमुख पाहूणे युवासेना तालुका प्रमुख कपिलभाऊ चव्हाण, पोफाळी सर्कल प्रमुख, तरोडा नगरीचा विकास होण्यासाठी शासन स्तरावरून विविध प्रकारच्या शासकीय योजना आणण्यासाठी सदैव धडपड करणारे संदीप खंडाळे, चर्मकार तालुका अध्यक्ष तथा उमरखेड तालुका प्रतिनिधी युवा पत्रकार गजानन वानखेडे, समाज संघटक विठ्ठल खंदारे, सामाजिक कार्यकर्ते राजेश गायकवाड, ग्रामपंचायत कर्मचारी साहेबराव खंदारे, श्रीकांत खंदारे, मित्रदेव हिंगाडे, विठ्ठल हुपाडे, विजय राठोड, सचिन धुळे, मुकेश देशमाने, मनिष कनवाळे, हरी खंडाळे, सुभाष हिंगाडे, पुंजाजी खंदारे, संतोष गायकवाड, विनायक खंदारे, बाळू चव्हाण, अविभाऊ चव्हाण, संदीप ठाकरे, राहूल भूसारे, विलास खंदारे, दिनेश आढाव, भारत खंदारे समस्त चर्मकार बांधव व गांवकरी यावेळी उपस्थित होते.