मोडकळीस आलेल्या विवाहसंस्थे वर भाष्य करणाऱ्या बोल ना तू… गाण्याचे प्रसारण

31

🔹शालिनी प्रोडक्शन व मॅड स्टुडिओ प्रस्तुत विशाल गोरे निर्मित “बोल ना तू” हिंदी म्युझिक अल्बम व्हॅलेंटाईन डे निमित्त रीलीज

✒️पुणे(पुरोगामी न्युज नेटवर्क)

पुणे(दि.17फेब्रुवारी):- प्रेमाचा शुभसंदेश देणाऱ्या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने शालिनी प्रोडक्शन व मॅड स्टुडिओ ची प्रस्तुती असलेल्या बोल ना तू… गाण्याचे प्रसारण अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराज भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी चित्रपट निर्माती विजयालक्ष्मी जाधव, फॅशन जगतातील लवेल प्रभू, आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेचे आयोजक कार्ल मस्कर्नेस, भ्रष्टाचार विरोध संघटनेचे अध्यक्ष चिराग आसवानी, बोल ना तू म्युझिक अल्बमचे निर्माते विशाल गोरे ,बोल ना तू म्युझिक अल्बमच्या अभिनेत्री व फॅशन मॉडेल मिसेस यूनीव्हर्स ऑस्ट्रेलिया आदी मान्यवर उपस्थित होते. नियोजित विवाह असो वा प्रेमविवाह पण तो टिकवण्याची जबाबदारी ही दोघांची असते त्या साठी महत्वाचा ठरतो तो एकमेकांमधला संवाद आणि तो तुटला तर नात्यांमध्ये दुरावा आणि गैरसमज निर्माण होऊन एक पवित्र नातं तुटू शकतं हे नातं जपण्या साठी व्यक्त व्हा हा संदेश “बोल ना तू “गाण्यातून देण्याचा प्रयत्न आम्ही केल्याचं विशाल गोरे यांनी आपल्या मनोगतात सांगितलं.संकल्पना व निर्मिती विशाल गोरे यांची आहे.

हे गीत मिसेस इंडिया यूनिवर्स ऑस्ट्रेलिया२०२२ डॉ प्रचिती पुंडे, यांच्या वर चित्रित झालं असून या गाण्यातून त्यांनी मनोरंजन क्षेत्रात प्रदार्पण केले आहे. गीत प्रशांत फासगे यांनी लिहिले असून गायन कृष्णा दाभाडे व चारूलता पाटणकर यांनी केले आहे.कॉस्च्युम डिझायनिंग रश्मी भटनागर आणि अल्बम पोस्टर डिझाईन नयनीश पगारे यांनी केले आहे. या म्युझिक अल्बमसाठी संजू तिवारी ,मॅड स्टुडिओ चे अध्यक्ष मृणाल गायकवाड, रेशु अगरवाल व चेतना बिडवे यांनी विशेष सहकार्य केले आहे. लीनाज वन ग्राम ज्वेलरी,पी .एस. के. ट्वेंटी फोर मसाले अँड फूड प्रॉडक्ट सहयोगी प्रायोजक असून गिफ्टींग पार्टनर प्लींक अ स्किन केअर होते.