संत शिरोमणी रविदास जयंती साजरी

29

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.17फेब्रुवारी):- चंद्रपूर जिल्हा सामाजिक समरसता मंच च्या वतीने आज दि 16- फेब्रुवारी 2022 ला तिथीनुसार माघ पौर्णिमेला संत शिरोमणी रविदास महाराज यांची 645 वि जयंती मोठ्या थाटा माटात साजरी करण्यात आली सामाजिक समरसता मंच जिल्हा सैयोजक डॉ नंदकिशोर मैंदळकर,सुदर्शन नैताम,बहादूरे ताई,गंगाधर गुरनुले,नितीन चांदेकर,सचिन बरबतकर,राजू कांबळे,पिंटू मुन आदी उपस्थित होते.

संत शिरोमणी रावीदासजींचा जन्म काशी येथे माघ पौर्णिमेला 1433 ला झाला त्यांनी स्वामी रामानंद,कबीर साहेब यांना आपले गुरू मानले रावीदासजी परोपकारी,दयाळू होते व दुसर्यांना सहाय्यता करण्यात त्यांना विशेष आनंद मिळत असे त्यांनी आपल्या प्रबोधणातून समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केले .मनं चंगा तो काटोती मे गंगा.मैं चाहू ऐसा राज मे,मिले सबको अन्न,छोट बढे सब सम बसे,रविदास रहे प्रसन्न.मनं ही पूजा मनं ही धूप,मनं ही शेहू-सहज स्वरूप समाजाला प्रेरित करणारे दोहे रचून समाजाची सेवाच केली.त्यांनी उंच निच तथा ईश्वर भक्ती करिता वाद विवाद करणे निरर्थक आहे सगळ्यांनी मिळून मिसळून प्रेमपूर्वक राहावे असा उपदेश केला.कार्यक्रम उत्साहात पार पडला परिसरातील बरीच मंडळी उपस्थित होती.