भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालयात स्काऊट शिबिराचा तिसरा दिवस उत्साहात संपन्न

28

🔸 स्काऊट ही जगातील सर्वात मोठी गणवेशधारी चळवळ – बी.व्ही.पवार

✒️जळगाव(पुरोगामी न्युज नेटवर्क)

जळगाव(दि.8मार्च):- येथे दि. ४ मार्च ते १० मार्च असे ७ दिवसाचे जिल्हास्तरीय स्काऊट बेसिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. आज तिसऱ्या दिवशी शिबिराची सुरुवात बी.पी. व्यायामाने करण्यात आली. व्यायामानंतर खेळ खेळविण्यात आला यामध्ये वाघ संघ प्रथम तर सिंह संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. मयूर व कोंबडा संघाने विजेता संघाचे अभिनंदन केले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना टोकण फ्लॅग देण्यात आले. यानंतर स्काउटची प्रार्थना चे गायन करण्यात आले व सिंह संघाच्या वतीने ध्वजारोहण करून झेंडागीत गायले.यानंतर स्काऊट शिबिराचे जिल्हाप्रमुख बी. व्ही. पवार सर , कोळी सर , गणेश पवार सर, बेलोरकर सर यांनी सिंह, वाघ, मयूर व कोंबडा या संघांच्या संघनायकांना सोबत घेऊन दोरी गाठीचे व शिकविलेल्या भागांचे इन्स्पेक्शन करण्यात आले. यानंतर सर्व शिबिरार्थींना अल्पोपहार देण्यात आला.

सकाळ सत्राचे पहिले मार्गदर्शक मा.बी.व्ही. पवार सर यांनी स्काउट गणवेश शर्ट, पॅन्ट ,टोपी, बेल्ट, स्कार्प, वागल, शुज, सॉक्स सभासदत्व पदक या सर्व ड्रेस कोड च्या संदर्भात विस्तृत असे मार्गदर्शन केले. यानंतर दुसऱ्या सेशनमध्ये मा. गणेश पवार सर यांनी स्काऊटच्या प्रगतीचे टप्पे व पायऱ्या या संदर्भात विस्तृत असे मार्गदर्शन केले. तसेच पुढील सेशन मध्ये जे एस पाटील सर यांनी होकायंत्र विषयी मार्गदर्शन केले. यासोबत तारकासमूह सप्तर्षी मृग, नक्षत्र ,शर्मिष्ठा ध्रुव मत्स्य व त्रिशंकू आणि अंदाज यामध्ये रुंदी मोजणे व उंची मोजणे या संदर्भात प्रात्यक्षिकासह विस्तृत असे मार्गदर्शन केलं.यानंतर डॉ.व्ही.एस.पाटील सर यांनी स्काऊटची प्रार्थना व स्काऊटचे वचन आणि धर्म या संदर्भात विस्तृत असे मार्गदर्शन केलं.

स्काऊट ग्रुपचा प्रारंभ याविषयी माननीय गणेश पवार सर यांनी शिबिरार्थींना विस्तृत असे मार्गदर्शन केले या सोबत बांधण्याचे प्रकार यामध्ये चौरस बांधणी, तिरकस बांधणी, समांतर बांधणी, ळ आकाराची बांधणी याविषयी मार्गदर्शन केले. यानंतर स्काऊट भवन च्या मैदानात गणेश पवार सर व कोळी सर यांनी प्रत्यक्ष या गाठींचे प्रात्यक्षिके करून दाखविले व सिंह वाघ मयूर आणि कोंबडा संघाने उत्साहाने भाग घेऊन आनंदात गाठींचे प्रात्यक्षिके केले. गाठींच्या प्रात्यक्षिकाचा सोबत सर्व मान्य वरण सोबत प्रशिक्षणार्थींनी एक ग्रुप फोटो काढला व आनंद व्यक्त केला.

दिवसभर शैक्षणिक सत्र, लिखाण काम यापासून थोडा विरंगुळा व्हावा यासाठी स्काऊट भवन च्या मैदानात विविध खेळ खेळविण्यात आले यामध्ये सिंह संघाने दोन वेळा विजेतेपद पटकाविले व सर्व संघांनी जयघोषात त्यांचे अभिनंदन केले.शिबिराच्या समारोपाप्रसंगी सुभाष चंद्र बोस चे ग्रुप लीडर यांच्या हस्ते ध्वजावतरण करण्यात आले. संध्याकाळी सर्व शिबिरार्थींनी भोजनाचा आनंद घेतला व शेकोटी कार्यक्रमांमध्ये चारही संघाने उत्साहाने भाग घेतला.