जिल्हा परिषद कन्या प्रशालेत लसिकरण मोहीम संपन्न

32

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.22मार्च):-तालुक्यातील सर्वात मोठी विद्यार्थी संख्या असलेली आदर्श मुलींची शाळा जिल्हा परिषद कन्या प्रशाला आष्टी येथे दिनांक 21 मार्च 2022 रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत वयोगट 12 ते 14 मधील 145 विद्यार्थीनींचे लसिकरण करण्यात आले.अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डाँ. नितीन मोरे व शाळेचे मुख्याध्यापक आबासाहेब खताळ यांनी दिली.

इयत्ता 6 ते 8 या वर्गातील वय वर्ष 2008, 2009, 2010 या मधील विद्यार्थीनी या योजनेसाठी लाभार्थी होती. या मधील उपस्थित असणाऱ्या 145 विद्यार्थीनींचे वैद्यकीय अधिकारी डाँ. नितीन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचारी श्रीम. सविता औटे, पंढरीनाथ पारेकर, श्रीम. विजया जोशी, दिगंबर भोंगळे, सौरभ सपकाळ, सय्यद कादर, नवनाथ गर्जे यांनी लसिकरण मोहीम राबविण्यास मोलाचे योगदान दिले.

याप्रसंगी लसिकरण मोहीमेस आष्टी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव यांनी भेट देवून समाधान व्यक्त केले.यावेळी लसिकरण व्यवस्थित नियोजनप्रमाणे होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक आबासाहेब खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली वर्गशिक्षक देविदास शिंदे, राजेंद्र लाड, श्रीम. स्वाती खेत्रे, श्रीम. संजिदा मिर्झा, श्रीम. लतिका तरटे, श्रीम.भाग्यश्री भापकर यांनी सुयोग्य नियोजन व आयोजन केले.