मनोज आव्हाड मारहाण व हत्या प्रकरणी आरोपीस आटक करा – हातागळे /आढागळे

✒️तलवाडा प्रतिनिधि(शेख आतिख)

तलवाडा(दि.28एप्रिल):-औरंगाबाद शहरात घडलेल्या आमानविकृत्या संदर्भात डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने गेवराई तहसिलला एक निवेदन देण्यात आले असुन या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून कार्यवाही करण्याची मागणी मदन हातागळे, व साईनाथ आढागळे यांनी केली आहे. गेवराई तहसिलला दिलेल्या निवेदनात म्हण्टले आहे.

दिनांक 20 / 04 / 2022 , रोजी औरंगाबाद शहरात घडलेल्या मनोज शेषेराव आव्हाड रा.शहा बाजार चंपा चौक , म्हाडा कॉलनी औरंगाबाद याला आरोपींनी पुर्व नियोजित कट रचुन हात व पायाला निळया रंगाचा स्कार्प व पंचशील रंगाचा स्कार्प बांधुन लोखंडी रॉडने त्याच्या पाठीवर , मानेवर , मनक्यावर , पायावर , डोक्याला वार करून बेदम मारहाण करून सदरील आरोपींनी मनोज आव्हाडची हत्या करण्यात आली .

अशा हरामखोर विकृत प्रवृत्तीच्या आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी यासाठी डेमोक्रॉटीक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने युवक तालुका अध्यक्ष साईनाथ आढागळे,बीड जिल्हा उपाध्यक्ष मदन हातागळे यांनी मा.तहसिलदार साहेब , गेवराई यांना निवेदन देऊन आरोपींना आटक करुन कठोर कार्रवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. मा. तहसिलदार साहेब गेवराई यांना दिलेल्या निवेदनावर साईनाथ आढागळे व मदन हातागळे यांच्या स्वाक्ष-या आहेत.

Breaking News

©️ALL RIGHT RESERVED