🔸नवीन जालना आणि जुना जालना यांना जोडणारा पूल बंद करणार-जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे🔸

11

🔹अँबुलन्स वगळता इतर सर्व वाहतूक बंद

✒️जालना(अतुल उनवणे,जिल्हा प्रतिनिधी, मो:-9881292081)

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभुमीवर उपाययोजना म्हणून जालनाचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे साहेब यांनी जुना जालना व नवीन जालना यांना जोडणारा लोखंडी पूल तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.नवीन जालना मध्ये झपाटयाने वाढणारी रुग्णांची संख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.वास्तविकत पाहता जुना जालना परिसरात रुग्णांची संख्या कमी प्रमाणात आहे व जुना जालना मध्ये लागणाऱ्या प्रत्येक अत्यावश्यक सेवा उपलब्ध आहेत.तरी पण विनाकारण जुना जालना मधून नवीन जालना मध्ये जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे यामूळे नवीन जालना मध्ये खुप गर्दी वाढत आहे परिणामी सोशियल डीसटनस चा फज्जा उडत आहे.व गर्दी च्या कारणांमुळे जुना जालना मध्ये पण रुग्णांची संख्या वाढू शकते हा संभाव्य धोका लक्षात घेता निर्णय घेतल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितलं आहे.

अँबुलन्स वगळता इतर सर्व वाहतूक बंद करण्याचा निर्णय मा.जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे.नवीन जालना भागात विनाकारण होणारी गर्दी लक्षात घेता सदरील निर्णय घेतल्याचे जिल्हाधिकारी साहेबांनी दिलेल्या संदेशात म्हटले आहे.