घुग्घुस नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन

33

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.3मे):-राज्यातील नगरपालिका , नगर पंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात शासन स्तरावर ठोस निर्णय न झाल्या मुळे कर्मचाऱ्यांनी कामगार दिनापासून राज्यव्यापी काम बंद आंदोलन पुकारले आहे.घुग्घूस न.प.कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत.त्यामुळे सामान्य नागरिकांचे न.प.तील कामे प्रभावित झाली आहेत.

नगरपरिषदेच्या न्याय हक्क उद्घोषणेनंतरच्या व अगोदरच्या नगर परिषद /नगरपंचायतींमधील मागण्यांसंदर्भात शासनाला अनेकवेळा निवेदन देऊनही शासनाने कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत . मंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचारी पदाधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीमध्ये राज्यातील नगरपालिका नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या १०० टक्के वेतन शासकीय कोषागारातून करणे आश्वासित पदोन्नतीचा लाभ तत्काळ लागू करणे , नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे नगरपंचायतीमध्ये सरसकट विनाअट समावेशन करणे , नगरपरिषदेमधील पात्र लिपिक व इतर कर्मचाऱ्यांचे संवर्गामध्ये समावेशन करणे , सफाई कामगारांना मोफत घरे बांधून देणे आदी मागण्यांसंदर्भामध्ये ठोस निर्णय झालेला नसल्याने कर्मचाऱ्यांनी कामगार दिनापासून राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे.

याप्रसंगी विठोबा बबन झाडे,सूरज भानय्या जंगम, शंकर नामदेव पचारे,दिनेश अनिल बावणे,संदीप विठ्ठल मत्ते,मोहसीन शेख बाबा कुरेशी,सुप्रिया दिनकर खोब्रागडे,राजू हनुमंत चिंतला,स्नेहल अनंता बहादे व सर्व कर्मचारी घुग्घूस नगर परिषदेसमोर काम बंद आंदोलन सुरू करण्यात आला आहे.