सर्वसामान्यांचा नेता: श्री प्रकाश पाटील देवसरकर

32

आज दि. २२ मे २०२२ रोजी उमरखेड विधानसभा मतदार संघाचे भाग्यविधाते माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर हे वयाची ६२वर्ष पूर्ण करून ६३ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत अशा या मनस्वी नेत्याच्या वाढदिवसानिमित्त त्यांना लाख लाख शुभेच्छा!

श्री स्व: विठ्ठलराव पाटील देवसरकर व श्रीमती केवळाबाई विठ्ठलराव देवसरकर या उभयतांच्या पोटी दि.२२ मे १९६० रोजी प्रकाश पाटील देवसरकर यांचा जन्म झाला. अतिशय धनवान कुटुंब विठ्ठलराव पाटलांचे होते. गोरगरीब जनतेचा त्यावेळच्या कोपरा,बोरी,चातारी, माणकेश्वर, ब्राह्मणगाव, सिंदगी व उमरखेड- हदगाव हिमायतनगर परिसरातील सर्व छोटे-मोठे काम करणारा हा राजा होता. पण विठ्ठलराव पाटलांचे काम तत्ववादी होते. चांगल्या कार्यासाठी ते पैसे देत होते. त्यामुळे ह्या कुटुंबात अनेक दिवसांनी विठ्ठलराव पाटलांना पुत्रप्राप्त झाले. त्यामुळे गोरगरीब जनतेने त्यांचे बारसे अतिशय आनंदाने केले. बारश्यास जे पैसे जमा झाले ती पूर्ण रक्कम श्री शिवाजी विद्यालय, चातारी ता.उमरखेड शाळेला दान केले. त्यामुळे या कुटुंबात पूर्वी पासून दातृत्व आहे. घरा आलेल्या माणूस हा ओल्या हातानेच गेला पाहिजे असा दंडक होता.

पाटील साहेब यांचे प्राथमिक शिक्षण श्री शिवाजी विद्यालय चातारी, सगरोळी व नंतर उमरखेड येथे गोपिकाबाई सिताराम गावंडे कला व वाणिज्य महाविद्यालय, उमरखेड येथे बी. कॉम. झाले व नंतर एल. एल. बी. केली साहेबांनी याच कॉलेजमध्ये राजकीय बाळकडूचे डोस घेतले. त्यावेळी त्यांनी फ्रेंड्स पॅनल तर्फे विद्यार्थी युवा अध्यक्ष पद भूषविले.

राजकीय वाटचाल: प्रथमता: सरपंच ग्रामपंचायत कोपरा बु. सन १९८४ ते ८९ , संचालक वसंत सहकारी साखर कारखाना मर्यादित पुसद, १९८८ ते १९९०,आमदार उमरखेड-महागाव विधानसभा १९९० ते ९५, संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक यवतमाळ १९९७ पासून आज पर्यंत कार्यरत आहेत, चेअरमन वसंत सहकारी साखर कारखाना मर्यादित पुसद २००३ ते २०१५ पर्यंत, चेअरमन जिजाऊ नागरी अर्बन बँक उमरखेड, ब्राह्मणगाव,मुळावा, ढाणकी, यवतमाळ २००६ ते आजपर्यंतची अशी राजकीय राजकीय वाटचाल आहे.

उमरखेड तालुका हा शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला होता तालुक्यातील गोरगरीब कष्टकरी माणसाला शिक्षणाचा गंध नसल्यामुळे त्यांची ही मुले शिक्षणापासून वंचित होते. प्रकाश पाटील देवसरकर यांच्या दूरदृष्टीमुळे आणि गोरगरीब जनतेच्या मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याचे दृष्टीने उमरखेड येथे ज्ञानप्रकाश शिक्षण प्रसारक मंडळाची मुहूर्त मेढ रोवली.तालुक्यातील शिक्षित असूनही बेरोजगार म्हणून जगणाऱ्या तरुणांना त्यांच्या अंगातील असलेले कलागुण ओळखून त्यांना संस्थेत नोकऱ्या दिल्यात.ज्ञानप्रकाश शिक्षण संस्था म्हणजे आमचे कुटुंब आहे. यामध्ये गोरगरीब लोकांच्या शिक्षित मुलांना जवळपास शेकडो लोकांना नोकरी दिली. आज एवढ्या कर्मचाऱ्याचा संसार प्रकाश पाटील देवसरकर साहेबांमुळे उभा झाला . आज तालुक्यातील तालुक्यातील ७ विद्यालय, असल्यामुळे खेड्यापाड्यातील वाडी तांड्यातील मुला-मुलींना शिक्षण मिळत आहे. अन्यथा काही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत होते पण या सर्व मुलांच्या पालकांची दुवा प्रकाश पाटील देवसरकर यांच्या पाठीशी आहे. आज अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर, अधिकारी झाले आहेत त्यामुळे ज्ञानप्रकाश शिक्षण संस्था नावारूपाला आली.

राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार जयंतराव पाटील यांचे वडील राजारामबापू पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात दबदबा होता. राजाराम बापू पाटील हे महाराष्ट्राचे नेते होते. त्यावेळी राजाराम बापू पाटील यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला होता. त्यावेळी कोपरा बु. ता. उमरखेड येथील प्रतिष्ठीत श्रीमंत श्री विठ्ठलराव पाटील देवसरकर यांच्याकडे राजारामबापू चे आगमन झाले होते श्री विठ्ठल राव पाटील देवसरकर हे राजाराम बापू पाटील यांचे सहकारी होते श्री विठ्ठल राव पाटील देवसरकर आणि राजारामबापू पाटील यांची राजकीय चर्चा सुरू असतांना तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेला प्रकाश पाटील यांचा त्या खोलीमध्ये प्रवेश झाला श्री विठ्ठलराव देवसरकर यांनी हा माझा मुलगा प्रकाश पाटील देवसरकर असा बापूंना परिचय करून दिला त्या क्षणी राजाराम बापू पाटील यांनी हा मुलगा भविष्यात महाराष्ट्राचा आमदार होईल असे भाकीत केले कोणतेही राजकीय वारसा व पाठबळ नसताना सन १९९० साली उमरखेड-महागाव विधानसभा मतदारसंघातून प्रकाश पाटील देवसरकर यांनी दैदिप्यमान विजय मिळवून महाराष्ट्राच्या विधानसभेत कमी वयाचा आमदार म्हणून नावलौकिक मिळवला.

राजकारणात उडी घेताना प्रकाश पाटील देवसरकर यांच्यावर राजारामबापू पाटील यांच्या विचारांचा पगडा होता उमरखेड तालुक्यातील तेव्हा नक्षलग्रस्त समजल्या जाणाऱ्या वन व जंगलाने वेढलेल्या जेवली या मथुरा, बंजारी, आदिवासी व मागासवर्गीय लोकांच्या मुलांची शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्या ठिकाणी राजारामबापू पाटील विद्यालय, जेवली असे नामकरण करून तेथील विद्यार्थ्यांना उच्च विभूषित होण्याचे भाग्य मिळवुन दिले आज राजारामबापू पाटील जेवली विद्यालयातून अनेक विद्यार्थी उच्च विभूषित झालेत. तालुक्यातील याच बंदी भागातील जेवली येथील शाळेतून जवळपास ५० विद्यार्थी एमबीबीएस डॉक्टर झालेत ही यवतमाळ जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे त्यांचे सर्व श्रेय श्री प्रकाश पाटील देवसरकर यांना जाते.

यवतमाळ जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात प्रकाश पाटील देवसरकर यांचा नेहमीच दबदबा राहिला आहे प्रकाश पाटील देवसरकर यांना नेहमीच संघर्षाला सामोरे जावे लागले संघर्षातूनच राजकारणात मोठी पदे प्राप्त करून कार्यकर्त्यांचा मोठा गोतावळा जमा केला यातूनच कार्यकर्त्यांना साखर कारखान्याचे चेअरमन, जिल्हा परिषदेचे सभापती, पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य अशी विविध पदे देऊन त्यांनाही मोठे करण्याचे काम प्रकाश पाटील देवसरकर यांनी केले. विशेष म्हणजे सध्या ग्राम विविध कार्यकारी संस्थेच्या निवडणुका होत आहेत त्यामध्ये उमरखेड विभागातून शेकडा 80 ते 90 टक्के संस्थेचा विजय प्रकाश पाटील देवसरकर यांच्या गटाकडे अतिशय जोरात घोडदौड चालू आहे. ही एक प्रकाश पाटील देवसरकर यांच्यासाठी अतिशय जमेची बाजू आहे. व उमरखेड विभागातून प्रकाश पाटील देवसरकर यांच्या नेतृत्वाला मानणारा खूप मोठा वर्ग आहे.

✒️श्री दिगंबर चंपतराव माने(शिक्षक)भगवती देवी विद्यालय,देवसरी,ता. उमरखेड जि.यवतमाळ,मो.नं. ९४०४४१२८८६