17 जुन रोजी महात्मा ज्योतिबा फुले लिखित दिग्दर्शक अनिरुद्ध वनकर यांच्या “तृतिय रत्न” नाटकाचा प्रयोग

30

✒️मुनिश्वर बोरकर(गडचिरोली,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9421734792

गडचिरोली(दि.7जून):-महाज्योती नागपूर च्या वतीने आपली व पुर्नवसन मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या सहकार्याने महात्मा ज्योतिबा फुले लिखित दिग्दर्शक अनिरुद्ध वनकर यांचे तृतिय रत्न या नाटकाचा प्रयोग महाराष्ट शासनाच्या ईतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत संस्था महाराष्ट्र शासनाच्या वतीने संपूर्ण महाराष्टात नाटक दौरा मोफत प्रवेश शुक्रवार दिनांक १७ जून 2022 सामकाळी ७.३० वाजता सांस्कृतिक लॉन आरमोरी रोड गडचिरोली येथे आयोजीत करण्यात आलेले आहे.

दिग्दर्शक सिनेस्टार, कलाकार, वादळ निळ्या नभाचे ‘ फेम कलावंत , अनिरुद्ध वनकर,हास्याचे फवारे उडविणारे डॉ. प्रा शेखर डोगरे सह 30 कलावंता सोबत सदर नाटय प्रयोगाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. तरी हजारोच्या संख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन म.ज्योतिबा फुले, डॉ. आंबेडकर विचार मंच , साहित्य सम्मेलनाचे आयोजक Adv राम मेश्राम जि.प. सदस्य गडचिरोली, सचिव मुनिश्वर बोरकर, सामाजीक कार्यकर्ता डॉ. कैलास नगराळे यानी एका पञ का द्वारे कळविले आहे .