चंद्रपूर जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर सुविधा युक्त :जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार

23

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर, दि.30 जून: जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर सर्व सुविधांनी युक्त आहे. तसेच या सेंटर मध्ये लागणाऱ्या आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे यासाठी कोणत्याही निधीची कमतरता राहणार नाही, अतिशय उत्तम व्यवस्था व वैद्यकीय अधिकाऱ्यांची तैणाती या ठिकाणी आहे.कोरोना बाधित बरे होत असून नागरिकांनी घाबरून न जाता वैद्यकीय निर्देशाचे पालन करावे, कोरोना आजारातून बरे होता येते, असे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यामध्ये आतापर्यंतची बाधितांची संख्या 95 झाली आहे. 54 बाधित कोरोना मुक्त झाल्यामुळे रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. रुग्णालयात उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या 41 आहे. यापैकी 38 बाधित कोविड केअर सेंटर वन अकादमी चंद्रपुर तर तीन बाधित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे भरती करण्यात आलेले आहे.

तालुकानिहाय बाधितांची संख्या:

ग्रामीण भागामध्ये तालुका चंद्रपूर-7, बल्लारपूर दोन, पोंभूर्णा दोन, सिंदेवाही दोन, मुल तीन, ब्रह्मपुरी 16, नागभीड चार, वरोरा पाच बाधित आहे. शहरी भागामध्ये बल्लारपूर चार, वरोरा 9, राजुरा दोन, मुल एक, भद्रावती चार, ब्रह्मपुरी-11, कोरपणा, नागभिड, गडचांदूर प्रत्येकी एक बाधित आहेत. तर चंद्रपूर महानगरपालिका भागामध्ये कृष्णनगर दोन, बिनबा गेट एक, बाबुपेठ तीन, बालाजी वार्ड दोन, भिवापूर वार्ड एक , शास्त्रीनगर एक, सुमित्रानगर चार, स्नेह नगर एक, लुंबीनी नगर 4, जोडदेउळ एक बाधित आहेत. असे एकूण बाधितांची संख्या 95 वर गेली आहे.

जिल्ह्यातील कोविड-19ची सर्वसाधारण माहिती:

जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यामध्ये 4 हजार 574 स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी 95 नमुने पॉझिटिव्ह, 4 हजार 104 नमुने निगेटिव्ह, 342 नमुने प्रतीक्षेत तर 33 नमुने अनिर्नयीत आहेत.

जिल्ह्यातील अलगीकरणा विषयक माहिती:

जिल्ह्यात एकूण संस्थात्मक अलगीकरणात 843 नागरिक आहेत. ग्रामस्तरावर 239 नागरिक,तालुकास्तरावर 239 नागरिक तर, जिल्हास्तरावर 358 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 83 हजार 646 नागरिक दाखल झाले आहेत. 80 हजार 790 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले आहे. 2 हजार 856 नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत आहे.

आतापर्यंतचे कोरोना बाधीतांचे विवरण :

चंद्रपूरमध्ये आतापर्यत 2 मे ( एक बाधित ), 13 मे ( एक बाधित), 20 मे ( एकूण 10 बाधित ), 23 मे ( एकूण 7 बाधित), 24 मे ( एकूण 2 बाधित), 25 मे ( एक बाधित ), 31 मे ( एक बाधित ), 2 जून (एक बाधित), 4 जून (दोन बाधित), 5 जून ( एक बाधित),6 जून ( एक बाधित), 7 जून ( 11 बाधित),9 जून (एकुण 3 बाधित), 10 जून ( एक बाधित), 13 जून ( एक बाधित), 14 जून ( एकुण तीन बाधित),15 जून (एक बाधित), 16 जून ( एकुण 5 बाधित), 17 जून ( एक बाधित), 18 जून ( एक बाधित), 21 जून (एक बाधित), 22 जून (एक बाधित), 23 जून (एकूण बाधित चार ), 24 जून (एक बाधित), 25 जून (एकूण 10 बाधित),26 जून (एकूण दोन बाधित), 27 जून (एकूण 7 बाधित), 28 जून (एकूण 6 बाधित) आणि 29 जून (एकूण 8 बाधित) अशा प्रकारे जिल्ह्यातील कोरोना बाधित 95 झाले आहेत. आतापर्यत 54 बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे 95 पैकी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आता 41 आहे.