चिमूरच्या डंपिंग यार्डमुळे नागरिक त्रस्त-शिवसेनेने दिला आंदोलनाचा इशारा!

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.5जुलै):-नगर परिषदतर्फेच नदी स्वछतेचे ढींडवड़े उडविले जात आहे, चिमूर क्रांति भूमि उमा नदीच्या तिरावर बसली असून याच नदीचे पाणी पिण्यासाठी वापरण्यात येत आहे, नगर परिषदेने याच नदीच्या पात्रात डंपिंग यार्ड तयार केले आहे.या डंपिंग यार्ड मुळे दुर्गंधि पसरली असून नदीचे पात्र प्रदूषित झाले आहे, त्यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे, सात दिवसात डंपिंग यार्ड हटविनयात आले नाही तर चिमूर तालुका शिवसेना च्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

चिमूर नगरपरिषद तर्फे शहरातील दुर्गंधि रोखण्यासाठी तत्कालीन मुख्याधिकारी मंगेश खवले यानी खरकाडा येथे डंपिंग यार्ड साठी जागा खरेदी करून शहरातील कचरा त्या ठिकानावर जमा करण्यात येत आहे, तरी सुद्धा जूना कचरा जुन्याच जागेवर असून त्या ठिकाणी आता कचऱ्यासोबतच मेलेली जनावरे, बकरयांचे मास, मेलेल्या बकऱ्या जुन्या डंपिंग यार्ड मधे टाकत आहेत, त्यामुळे येथील नागरिकांना दुर्गंधिचा सामना करावा लागत आहे, याच दुर्गंधि मुळे नागरिकांनचे आरोग्य धोक्यात आले आहे, ताडोबा पर्यटकाना सुद्धा या मार्गावरुन जाताना दुर्गंधिचा सामना करावा लागत आहे, याच डंपिंग यार्ड वर जनावरे, डुकर यानी कचरा अस्ताव्यस्त केल्यामुळे बाजूच्या रोडवर कचरा पसरला आहे.नगरपरिषद प्रशासनाने त्वरित डंपिंग यार्ड स्वच्छ केले नाही तर शिवसेना नगर परिषद समोर कचरा नेऊन टाकेल असा इशारा शिवसेने तर्फे देण्यात आला आहे,
——
” उमा नदीच्या पुरात अनेकदा डंपिंग वाहून गेले आहे, प्लास्टिक जनावरांचे मास, कोम्बड्याचे पीस, व अन्य कचर्याने नागरिकांना परेशानीचा सामना करावा लागत आहे, याची तात्काळ दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, – श्रीहरी सातपुते शिवसेना तालुका प्रमुख चिमूर”,

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED