चिमूर पोलिसांनी केली अवैद्य दारू तस्करांवर कारवाई- 4 लाख 59हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त

26

✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि-2जुलै) चिमुर-वरोरा रोड वरील आठवले समाजकार्य महाविद्यालया जवळ एका गाडीचा अपघात झाल्याची माहिती मिळताच चिमुर पोलीसानी घटनास्थळाला भेट देऊन गाडीत अडकलेल्या अपघात ग्रस्तांना बाहेर काढले त्यानंतर गाडीचे चौकशी केली असता सदर गाडीत दारू साठा आढळून आला.या कारवाईत दोगांना 4 लाख 59 हजार 400 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई आज दि.2 जुलै रोजी 2.30 ते 4 वाजे पर्यन्त करण्यात आली.

आज दि.2 जुुलै रोजी रात्र्रौ्  2 वा.दरम्यान वरोरा ते चिमूर रोडने देशी दारूच्या मुद्देमालाची तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्याने तस्करांवर कारवाई करणे करीता चिमूर पोलीस पाळत ठेऊन असताना एक पांढऱ्या रंगाचे वाहन शेंडेगाव येथील आठवले कॉलेज जवळ अपघात झाल्याची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. त्यावेेळी शेेेवरलेेेत कंपनीची R 8728 मध्ये आरोपी  रिझवान अब्दुल बशीर रा. नागपूर , कुणाल नागोराव हांडे रा. हिंगणघाट जी. वर्धा हे जखमी अवस्थेत अपघातग्रस्त वाहनात अडकून असल्याचे दिसून आले. शेंडेगाव येथील गावकऱ्यांचे मदतीने त्यांना तात्काळ अंबुलन्सने रुग्णालय चिमूर येथे उपचारा करीता कामी पाठवून वाहनात असलेला देशी दारूचा एकूण 4,59,400 रुपयेचा मुद्देमाल ताब्यात घेऊन आरोपितांवर कलम 279,337,338,269,271,188 भांदवी सह कलम 65अ,83 मदाका , 51 ब राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा , कलम 3 साथीचा रोग प्रतिबंधक कायदा व 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून दोन्ही आरोपीना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाही  उपविभागीय पोलीस अधिकारी अनुुुप तारे,पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे पो.स्टे. चिमूर यांचे मार्गदर्शनात पोउपनी अलीम शेख, पोहवा विलास सोनूले, विलास निमगडे , नापोशी किशोर बोढे, पोशी सतीश झिलपे, अवधूत खोब्रागडे, चापोशी विजय उपरे व शेंडेगाव येथील गावकरी मंडळी यांनी पार पाडली.