भूदान, पट्ट्यांच्या जमीनीची सर्रास विक्री

32

🔸जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना पिरिपाचे निवेदन

🔹महसूल विभाग योग्य कारवाई करणार का❓

✒️प्रतिनिधी गडचिरोली(चक्रधर मेश्राम)

गडचिरोली(दि.12जुलै):-गडचिरोली आणि आसपासच्या शेतकऱ्यांना जमिनीची मशागत करून, आणि उत्पादन घेऊन कौटुंबिक उपजिवीका करता येईल या उदात्त हेतूने शासनाकडून जमीनीचे वाटप करण्यात आले. परंतु शहरातील काही महाभागांनी , लॅंड डेव्हलपरनी पैशाच्या जोरावर अनेक शेतकरी, कामगार यांच्या जमीनी आमीश दाखवून विकत घेऊन आणि त्या जमीनीचे प्लाटमध्ये रुपांतर करुन अमाप भावाने विक्री सुरू केली आहे. या बाबींकडे मा. जिल्हाधिकारी यांनी तसेच संबंधित महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पराकोटीने लक्ष केंद्रित करून हा प्रकार थांबवुन जनतेला योग्य न्याय द्यावा.

सध्याच्या स्थितीत गडचिरोली शहरात प्लाट विक्रीचा व्यवसाय जोमाने सुरू आहे. त्यासाठी अनेक एजंट, दलाल पैसे मिळाले पाहिजे म्हणून काम करीत आहेत. भूदान – पट्ट्याच्या जमीनी अशा प्रकारे विकल्या गेल्या तर अनेक शेतकरी – शेतमजूर भूमीहीन होऊन उपजीविकेचे साधनांपासून वंचित राहातील यात शंका नाही.शासनाने उपजिवीका करण्यासाठी दिलेल्या जमीनी ह्या मा. जिल्हाधिकारी किंवा तत्सम अधिकारी यांच्या पूर्वपरवानगी शिवाय विकता येत नाही. किंवा हस्तांतरित करता येत नाही असा नियम असला तरी गडचिरोली येथे जमीनी विकत घेऊन प्लाट विक्रीचा व्यवसाय जोमाने सुरू आहे. यासाठी महसूल विभागच छुप्या मार्गाने परवानगी देत आहे का❓ असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्लॉट तयार करतांना शासकीय कार्यालयात जाऊन बरेच कागदपत्रे तयार करावी लागतात. त्यावेळी संबंधित अधिकारी व कर्मचारी डोळे झाकून काम करतात का❓

गडचिरोली शहरालगत असलेल्या नवेगाव, कोटगल , इंदाळा, पारडी गोगांव,अडपल्ली परिसरात अनेक शेतकरी , कामगारांना उपजिविका करण्यासाठी शासनाने पट्ट्याची शेतजमीन दिली आहे. मात्र या जमीनी विकत घेऊन आणि त्या जमीनी चे प्लाट करून विविध प्रकारच्या मार्गाने विकली जात आहे. गडचिरोली शहरात असे अनेक महाभाग अशा जमीनी विकत घेऊन आणि ले आऊट टाकून बिनधास्तपणे विकत आहेत. या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष होत आहे. सद्यास्थितीत कोटगल येथील वसंत मेश्राम यांना शासनाकडून मिळालेली जमीन श्याम कश्यप यांनी विकत घेतल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

वसंत मेश्राम भूमीहीन होणार नाही यासाठी श्याम कश्यप यांनी आगळे वेगळे मार्ग शोधून भूदानाची मिळालेली जमीन विकत घेण्याचा बेकायदेशीर पद्धतीने कट रचला आहे. श्याम कश्यप यांनी प्लाट विक्रीचा व्यवसाय करीत असताना सोबत असलेल्या बिझनेस पार्टनरचीही फसवणूक केल्याचे कोटगल परीसरात चर्चिले जात आहे. सोबत ज्यांचे सहकार्य लाभले त्यांना ही लाभांशची रक्कम दिली नाही. लाभांशची रक्कम मागीतली असता वारंवार टाळाटाळ केली जाते . लाभांशची रक्कम अदा करण्यासाठी दिलेले धनादेशही वटले नाही. याबाबत सखोल चौकशी करून योग्य कारवाई करण्यात यावी.या मागणीसाठी पिपल्स रिपब्लिकन पार्टी जिल्हा गडचिरोली च्या वतीने गडचिरोली जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी पिरिपाचे जिल्हाध्यक्ष मुनिश्वर बोरकर यांच्या नेतृत्वाखाली चक्रधर मेश्राम, संदीप बालखेडे, प्रकाश बंडवाल, जीवन मेश्राम, पत्रकार अनुप मेश्राम, रोशन उके यांनी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री मंत्रालय मुंबई, मा. महसूल मंत्री, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच मा.जिल्हाधिकारी,
यांना निवेदन देण्यात आले.