माढा जामगाव रस्त्यावर खड्ड्यात वृक्षारोपण आंदोलन करून सार्वजनिक बांधकाम विभागाचां लाक्षणिक निषेध : प्रहार संघटनेच्या वतीने

31

✒️नानासाहेब ननवरे(कुरुल प्रतिनिधी)

कुरुल(दि.19जुलै):- महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री मा.ना. बच्चु कडू यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष दत्ता मस्के , जिल्हा समन्वयक पंडित साळुंके यांच्या नेतृत्वाखाली प्रहार शेतकरी संघटना सोलापूर जिल्हाभर काम करत आहे. शेतकरी , अपंग, विधवा यांच्यासाठी कायम प्रहार शेतकरी संघटना काम करत आहे. माढा ते जामगाव या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली असून सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार विनंती करूनही मुद्दाम या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे.या मार्गावरील काही ठिकाणी दुरुस्तीचे काम झाले असून ही ते अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. त्यातील बरेचसे काम अर्धवट तसेच ठेवले आहे. माढा ते माढा रेल्वे गेट पर्यंतचा रस्ता तर अतिशय खड्डेमय झाला आहे.त्यामुळे या भागात खड्डे चुकवन्याच्या नादात अपघात होत आहेत.

त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.त्यामुळे आज माढा जामगाव रस्त्यावर खड्ड्यात वृक्षा रोपण आंदोलन करून सार्वजनिक बांधकाम विभागाचां लाक्षणिक निषेध प्रहार शेतकरी संघटनेचे वतीने करण्यात आला. आजच्या या आंदोलनाला अधिकारी ही निवेदन घ्यायला उपस्थित नव्हते या सारखी लाजिरवाणी गोष्ट नसल्याचे मत तालुका अध्यक्ष अमोल केसरे यांनी व्यक्त केले. येत्या 15 दिवसात रस्ता न झाल्यास प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय फोडल्या शिवाय राहणार नाही असे पंडित साळुंके यांनी सांगितले.

त्या प्रसंगी प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा समन्वयक पंडित साळुंके, माढा तालुका अध्यक्ष अमोल केसरे, उंदरगावचे मां.उपसरपंच बालाजी नाईकवाडे, तालुका उपाध्यक्ष भास्कर कदम, माजी सरपंच सुनील लोंढे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विभाग प्रमुख विश्वजित पाटील, बिरुदेव शेळके, दादासाहेब तांबीले, अमोल तांबीले, विष्णु सुतार, संतोष कोळी, काशिनाथ चव्हाण, स्वप्नील चव्हाण, जमीर शेख, राज लवटे, संदीप चव्हाण, रामदास नाईकवाडे,अजिंक्य कासार, कुंडलिक नागटिळक, अनिकेत साळुंके, हरी भुसारे, वसंत नाईकवाडे, दिलीप तांबीले, अण्णासाहेब नाईकवाडे, बाळासाहेब साळुंके, वामन तांबिले, बालाजी कांबळे, समाधान कोकाटे, बबलू जगताप, अमोल काळोखे, दादा भुसारे, लखन जाधव , महेश भुसारे, महादेव माळी, सुभाष वाघमोडे, वसंत नाईकवाडे शशी नाईकवाडे यांचे सह अनेक शेतकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.*